आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Strike To Student And Parents For Without Donation Admission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देणगीशिवाय प्रवेशासाठी पिता-पुत्राचे शाळेतच धरणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: देणगी दिल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे मराठा हायस्कूलच्या प्रशासनाने सांगितल्याचा आरोप करून एका पालकाने आपल्या पाल्यासह शाळेच्या आवारातच धरणे धरले आहे. शाळेचे व्यवस्थापन देणगीशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश देईल त्याचवेळी हे धरणे आंदोलन मागे घेऊ, अशी स्पष्ट भूमिका पालक प्रकाश खुळे यांनी घेतली आहे.
मराठा हायस्कूल या संस्थेत इयत्ता पाचवीच्या सेमी इंग्रजी वर्गातील प्रवेशासाठी 4 हजार रुपये देणगी पालकांकडून वसूल केली जात असल्याचे खुळे यांचे म्हणणे आहे. पालकांनी हे पैसे देणगी रुपाने दिल्यानंतर, आपल्या पाल्याला नि:शुल्क प्रवेश मिळाल्याचे हमीपत्र पालकांकडून भरून घेतले जाते. त्यानुसार देणगी देऊन हमीपत्र भरुन देण्यास नकार देताच पाल्याचा पाचव्या इयत्तेतील प्रवेश संस्थेकडून रोखण्यात आल्याचे खुळे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शाळेच्या देणगी स्वीकारण्याच्या या भूमिकेमुळे केंद्राच्या सर्वांना शिक्षणाचा हक्क नाकारला जाऊन मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा भंग होत असल्याचा आरोप खुळे यांनी केला आहे.
याप्रकरणी इमारत निधीशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नसल्याची भूमिका शाळेने घेतली असून, मुख्याध्यापकांच्या परवानगी शिवाय अर्ज स्वीकारण्यास शाळेच्या सेवकांनी नकार दिला. याशिवाय मविप्र व्यवस्थापन आणि शिक्षणाधिकार्‍यांनीही प्रांजल खुळे या विद्यार्थ्याच्या प्रवेशाला नकार दिला असल्याचे प्रकाश खुळे यांनी म्हटले आहे. मंगळवारी प्रकाश खुळे आणि विद्यार्थी प्रांजल यांच्या धरणे आंदोलनाला छात्रभारती, भारतीय विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या संघटनांच्या प्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. या घटनेबाबतच्या प्रति जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.