आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: जुन्या वाड्यांच्या स्ट्रक्चरल अाॅडिटचा यंदाही विसरच, केवळ नाेटिसांचेच सोपस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील गावठाण भागात असलेल्या एेतिहासिक वाड्यांकडे शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांसह स्थानिकांनीही दुर्लक्ष केल्याने हे वाडे अचानक काेसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गेल्या वर्षी चार ते पाच वाडे अचानक कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर यंदाही तशी शक्यता अाहे. पालिका प्रशासनाने या वाड्यांना नोटिसा बजावून त्यांचे स्ट्रक्चरल अाॅडिट करून दाेष दूर करण्याची संधी असताना प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्षच हाेत अाहे. जणू हे वाडेच जमीनदाेस्त हाेण्याची वाट प्रशासन पाहत अाहे. या धोकेदायक स्थितीतील वाड्यांमुळे स्थानिकांना धोका अधिक वाढल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत आढळले. प्रशासनाच्या उदासीनतेवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत.. 

गेल्याकाही दिवसांपासून जुने नाशिक भागातील काही वाडे अचानक काेसळत असल्याचे समोर आल्यानंतर ‘डी. बी. स्टार’ने परिसरात पाहणी करून वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी नवीन बांधकामाला परवानगी मिळत नसल्यामुळे तर काही ठिकाणी भाडेकरूंना काढण्यासाठी जुने वाडे पाडले गेल्याचे दिसून आले अाहे. दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून संबंधित वाडेमालकांना नोटीस बजावली जाते. मात्र, या वाड्यांची दुरुस्ती केलेली नसल्याचेच दिसून येेते. महापालिकेकडून केवळ नोटिसा बजाविण्याचेच साेपस्कार पार पाडले जात असल्याने, या नोटिसांकडेही दुर्लक्षच केले जात आहे. पावसाळ्यात बहुतांश वाड्यांचे काही भाग खचून पडतात माेठ्या प्रमाणात वित्तहानी हाेते, हे ठरलेलेच. या पार्श्वभूमीवर दरवर्षी महापालिकेकडून वाडे रिकामे करून घेण्यासाठी नाेटिसा बजावल्या जातात. प्रत्यक्षात या वाड्यांचे स्ट्रक्चरल अाॅडिट करून घेण्यासाठी सक्ती हाेताना मात्र दिसत नाही. दुसरीकडे नुतनीकरणासाठी महापालिकेकडून परवानगी मिळत नसल्यामुळे याच अडचणींचा फायदा घेत वाड्यावर कब्जा मिळवण्यासाठी माेठी लाॅबीच सक्रिय झाल्याचे चित्र अाहे. जुने नाशिक परिसरात अाजघडीला अनेक वाड्यांची पडझड झाली असून बरेच वाडे अाता काेसळण्याच्या मार्गावर अाहेत. 
 
भाडेकरूंना काढण्यासाठीही फंडा... 
जुन्यानाशिक परिसरातील बऱ्याच वाड्यांमध्ये घरमालकांबराेबरच भाडेकरूही राहतात. भाडेकरूंना साधारण तीस ते दीडशे रुपयांपर्यंत भाडे असून माेक्याची जागा लक्षात घेता या भाड्यात जागा देणे मालकांना परवडत नाही. दुसरीकडे नुतनीकरण करताना भाडेकरूंकडूनही जागेवर हक्क सांगितला जात असल्यामुळे प्रकरण हाताघाईपर्यंत जात अाहेत. अनेक प्रकरणे पाेलिस ठाण्यापर्यंत पाेहोचली अाहेत. त्यातून साेपा उपाय म्हणून थेट वाडेच जमीनदाेस्त करण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जाते. 

वर्षभरात १० हून अधिक वाडे जमीनदाेस्त 
गेल्यावर्षभरात जुन्या नाशिकसह पंचवटी भागातील १० हून अधिक धोकादायक वाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात जुने नाशिक परिसरातील चित्रघंटा, रविवार कारंजा, तांबट गल्ली, अमरधामरोडवरील आणि पंचवटी भागातील वाड्यांचा समावेश आहे.

‘चित्रघंटा’ परिसर धोकादायक 
जुन्या नाशकातील नवा दरवाजा भागातील चित्रघंटा परिसरात मोठ्या प्रमाणावर जुने वाडे आहेत. या परिसरातील पेखळे वाड्याची भिंत शेजारच्या घरावर कोसळून एका महिला अडकली हाेती. मात्र, सुदैवाने तिची सुटका करण्यात यश अालेले. दोन दिवसांपूर्वीच अकोलकर वाडा खेडकर वाडा कोसळल्याने ‘चित्रघंटा’ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

हजार ५३ धोकादायक इमारतींना नोेटिसा 
शहरातील महापालिकेच्या सहा विभागांमधील धोकादायक वाडे पडक्या घरांना नोटिसा बजावण्याचे साेपस्कार दरवर्षी पार पाडले जातात. गेल्या वर्षी यंदाही तब्बल हजार ५३ धोकादायक वाडे २० अनधिकृत इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या नोटिसा केवळ देखावाच ठरत आहेत. 

अशी आहेत अनधिकृत कामे.. 
बांधकामकरताना सामासिक अंतर सोडणे, पालिकेच्या जागेत बांधकाम करणे, पार्किंगच्या जागेचा इतर कारणासाठी वापर करणे, टेरेसवर बांधकाम (गॅलरी), शेड बांधणे, इमारती खिळखिळ्या होणे अशाप्रकारच्या कामांचा यात समावेश आहे. नगररचना विभागातील एकूण २५० इमारतींना १,०५३ जुन्या वाड्यांना नोटिसा बजावण्यात अाल्या होत्या. मात्र, संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे दिसते. 
 
अडचणींचा घेतला जाताेय फायदा 
गावठाणातीलजुन्या बांधकामांच्या नूतनीकरणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. मध्यंतरी महासभेत नगरसेवकांनी एकजूट करून पूररेषेत येणाऱ्या बांधकामांच्या नूतनीकरणाला जागा मालकाच्या वैयक्तिक जबाबदारीवर परवानगी देण्याचा ठराव झाला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी हाेत नसल्यामुळे धाेकादायक वाड्यांचे नूतनीकरण रखडले अाहे. त्याचाच फायदा उचलत राजकीय वरदहस्त लाभलेल्या मंडळींकडून वाडेखरेदीसाठी प्रस्ताव येत अाहेत. जागामालकाची अडचण लक्षात घेऊन कमी किमतीत वाडेखरेदीचे प्रकारही घडत अाहेत. काही ठिकाणी तर गुंडांकडून धमकावून जागा खाली करून घेण्यासाठीही दबाव टाकला जात असल्याचे खासगीत सांगण्यात अाले. 

थेट प्रश्न: विभागीय अधिकारी, पालिका पुर्व विभाग
 

शहरातील जुन्या वाड्यांची स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. काही वाडे कोसळलेही आहेत. त्यासंदर्भात काय उपाययोजना केल्या जात आहेत? 
>पूर्व विभागातील ४० वाड्यांना नोटिसा दिल्या आहेत. नदीकाठ परिसरातील २१६ घरांतील कुटुंबांनाही सुरक्षितस्थळी 
स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत. 

स्ट्रक्चरल अाॅडिट करून दाेष दूर करण्याची संधी असतानाही अनेकांकडून दुर्लक्ष होते त्याचे काय? 
>महापालिका प्रशासनाकडून धोकेदायक वाड्यांची माहिती घेतली जात आहे. स्ट्रक्चरल अाॅडिट करून दाेष दूर सूचनाही केले जात आहेत. 

पावसाळ्यात या धोकेदायक वाड्यांच्या संदर्भात काय उपायोजना केल्या जातील? 
>पावसाळ्यात धोकेदायक वाडे आणि घरे खाली करुन रहिवाशांना पालिका समाजमंदिर किंवा शाळेत जागा दिली जाईल. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने नियोजनही करण्यात आलेले आहे. 
बातम्या आणखी आहेत...