आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे पाठ, गोळे कॉलनीत मंदार सोसायटीला नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडेजुने नाशिक भागातील धोकेदायक वाड्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होते असताना, मध्यवस्तीतील गोळे कॉलनी भागातील जुन्या इमारतींच्या छतांना तडे जाऊ लागले आहेत. त्यातून एका इमारतीच्या छताला भगदाड पडल्याची तक्रार ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब चौधरी यांनी केल्यानंतर पालिका आयुक्तांनी इमारत धोकेदायक असल्याचे सांगत तातडीने दुरुस्तीची नोटीस दिली आहे. दरम्यान, ३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचनेकडे बहुतांश सोसाट्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
गोळे कॉलनीतील मंदार कोऑपरेटीव्‍ह, सोसायटीच्या ‘अ’ विंगमधील छताला मोठे तडे गेल्याची तक्रार तेथील रहिवासी चौधरी यांनी केली होती. सदनिका क्रमांक 13, 14, 15, 16, वरील छतावर पावसाळ्यात गवत उगवले असून, तडे गेल्याने पाण्याचे ओहोळ घरात येतात. विशेषत: छताकडील मजल्यावरील रहिवाशांना त्रास असून, त्याकडे तळमजल्याकडील रहिवाशांचे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी प्रभारी आयुक्त सोनाली पोक्षे-वायंगणकर यांच्याकडे इमारतीमुळे जीवित वित्तहानीची भीती व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांनी सूचना देत विभागीय अधिकाऱ्यांमार्फत इमारतीला नोटीस बजावली. दरम्यान, नगररचना विभागानेही इमारतीच्या अध्यक्षांना नोटीस बजावत स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्याचे आदेश दिला. ऑडिट करून बांधकाम सुस्थितीत असल्याचा दाखला दिल्यास जीवित वा वित्तहानी झाली तर सोसायटी जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.