आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणात खंड, तरीही पुढे जाण्याची जिद्द,शाळेतून मिळाले मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकांच्या घरी धुणी-भांडी करत ती कुटुंबाला हातभार लावते... शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे सातवीनंतर तीन वर्षांचा खंड पडला... मात्र, शिक्षणाची कास सोडली नाही. बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून १७ नंबरचा अर्ज भरून तिने दहावीत यश मिळवले.

दीपाली नगर येथे वाॅचमनचे काम करत असलेले सुभाष काळे यांची वंदना ही मुलगी. दीपालीने महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले. दोन मुली आणि मुलाची जबाबदारी पेलणे आता सुभाष काळे यांना अवघड वाटते. कुटुंबाला हातभार म्हणून वंदना आणि तिच्या आईलाही धुणी-भांड्याचे काम करावे लागते. कामामुळे शाळेत जायला वेळ मिळत नसल्याने वंदनाला शिक्षण अर्धवट ठेवावे लागले.

शिक्षिका श्रद्धा जगताप यांच्याकडे शिकण्याची भावना व्यक्त केल्यावर त्यांनी तिला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तेव्हापासून तिचा रखडलेला शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. शिकण्याची जिद्द बाळगून तिने अभ्यास केला. श्रद्धा टीचरच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात ती दहावी ४१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. मात्र, या गुणांमुळे ती अजिबातच समाधानी नाही. यापुढे अधिक लक्ष केंद्रित करून तिला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. तिला नृत्यकलेची प्रचंड आवड असून, त्यात करिअर करण्याची तिची इच्छा आहे. पण त्यासाठी तिला हवीय दानशूरांच्या मदतीचे बळ.

मदतीसाठी संपर्क साधा
समाजातअसेही काही विद्यार्थी अाहेत की, ज्यांनी अतिशय बिकट परिस्थितीत दहावीत यश संपादित केलंय. हे यश घवघवीत वगैरे असेलच असे नाही. पण, त्यातून शिकण्याची त्यांची जिद्द मात्र अधाेरेखित हाेते. अशा बिकट परिस्थितीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यशाेगाथा ‘दिव्य मराठी’ प्रसिद्ध करीत अाहे. बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही वंदनाने दहावीत यश मिळवले. आता तिचा पुढील शिक्षणाचा मार्ग खडतर आहे. तिला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ६०१४५१३८००६ या खात्यावर मदत करावी किंवा ९५७९२१२५१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...