आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवेशप्रक्रिया झाली ‘आॅन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहावीच्या परीक्षेचा निकाल आठवडाभरापूर्वी आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर गुरुवारी (दि. 26) दुपारी विद्यार्थ्यांना शाळांमधून गुणपत्रके मिळाली. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेस खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला.

शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेश अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. दुपारनंतर गुणपत्रके मिळाल्याने वेळेअभावी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्या दिवशी मेरिट फॉर्म सादर न करता आल्याने शुक्रवार (दि. 27) पासून प्रत्यक्ष अर्ज व कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत.

एचपीटी व आरवायके महाविद्यालयात आॅनलाइन व प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या दिवशी तब्बल तीन हजार प्रवेशअर्जांची विक्री झाली. मविप्र संचलित 54 कनिष्ठ महाविद्यालयांत आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, प्रवेशाच्या पहिल्या दिवशी कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी यांसाठी 1 हजार 354 विद्यार्थ्यांनी मेरिट फॉर्म भरले. त्यात केटीएचएम महाविद्यालयात 877
अर्ज दाखल झाले, तर सिडको महाविद्यालयात 166 अर्ज दाखल झाले. बीवायके महाविद्यालयात 125 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयासाठी 50 विद्यार्थ्यांनी अर्र्ज भरले आहेत.
अशी होणार प्रवेशप्रक्रिया
गुरुवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, सोमवार (दि. 30) जूनपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन मेरिट फार्म भरावयाचा आहे. त्यानंतर 3 जुलै रोजी दुपारी 4 वाजता संकेतस्थळावर संवर्गनिहाय गुणवत्तायादी (मेरिट लिस्ट) जाहीर होणार आहे. 4 ते 7 जुलैपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश अर्ज तपासणी व प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिक्त जागांची प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. 8 ते 10 जुलैपर्यंत रिक्त जागांतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.