आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय प्रतीके

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मोर, वाघ, अशोकस्तंभ, कमळ या राष्ट्रीय प्रतीकांचे जिगसॉ पझल जणू विद्यार्थ्यांच्या हातातील पडद्यावर उलगडले जात होते व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी ते मनमोहक दृश्य पाहून टाळ्यांचा कडकडाटाने प्रतिसाद देत होते, निमित्त होते सिम्बॉयसिस शाळेच्या क्रीडादिनाचे.
बुधवारी येथील सिम्बॉयसिस शाळेचा क्रीडादिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी पी.वेलरासू उपस्थित होते. ‘हार जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आज जरी तुम्हाला अपयश येत असेल तरीही उद्या तुम्ही यशस्वी होणार आहात हा विश्वास विद्यार्थ्यांनी मनात रुजवला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी वेलरासू यांनी केले. क्रीडादिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर टायकॉन्डू, योगासने, कवायती, कोलावरी डी गाण्याच्या ठेक्यावर बँड असे विविध क्रीडाप्रकार सादर केले. जिल्हाधिका-यांच्या पत्नी बी. वेलरासू यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी सिम्बॉयसिस व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सी. आर. पाटील, मुख्याध्यापक सुरिंदर सबरवाल, केजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिनी देशमुख, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट व हेल्थ सायन्सेसचे समन्वयक डॉ. अभय सुखात्मे व पालक उपस्थित होते.