आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांना 23 पर्यंत अर्जाची संधी, अभियांत्रिकी, फार्मसी पदवी प्रवेशासाठी 11 मे रोजी परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसह आैषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांकरिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ च्या प्रवेशासाठी शासनातर्फे ११ मे रोजी एमएचटी सीईटी ही सामायिक प्रवेशपरीक्षा घेतली जाणार आहे. 
 
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी देणे अनिवार्य असते. 
 
अशी होईल परीक्षा 
प्रवेशअर्ज भरणे : २३मार्चपर्यंत 
प्रवेशपत्र होतील उपलब्ध : २४एप्रिल ते ११ मे 
एमएचटीसीईटी प्रवेश परीक्षा : ११मे 
निकाल होणार जाहीर : 4 जून
 
एकच अर्ज भरावा लागेल 
अभियांत्रिकी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाेसाठी एकच अर्ज भरावा. लागेल. - प्रा. सुनील बच्छाव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक.
 
 
बातम्या आणखी आहेत...