आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Celebrate Days In College Issue At Nashik

ट्रेंडी अन‌् हटके लूक.. महाविद्यालयात तरुणाईची धम्‍मालमस्‍ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजब-गजब वेशभूषा, हटके लूक, तसेच ग्रुप्सने सुरू असलेली धमालमस्ती हे सर्व चित्र शुक्रवारी नाशकिरोड येथील बिटको चांडक महाविद्यालयात बघावयास मिळाले. डे‌ज् सेलिब्रेशनमध्ये बिटको, तसेच धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये ग्रुप डे, मिसमॅच डे आणि ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा सर्वांच्याच आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या.
बिटको चांडक महाविद्यालयात आयोजित डेज् सेलिब्रेशनअंतर्गत शुक्रवारी मिसमॅच डे, ग्रुप डे, रेट्रो डे तसेच ट्रॅडिशनल डे असा हटक्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनीही केलेल्या िसनेतारकांच्या वेशभूषा आकर्षक ठरल्या.
धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात शुक्रवारी डेज् सेलिब्रेशनमध्ये रेट्रो, ग्रुप आणि ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या. या वेळी विद्यार्थिनींनी अशा पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या.