आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू; संतप्त रहिवाशांचा रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ स्टेट बँक चौकासमोर रस्ता ओलांडणार्‍या विद्यार्थ्याचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाल्याने संतप्त रहिवाशांनी बुधवारी दुपारी महामार्ग रोखला. त्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

ऋषिकेश सुभाष पगारे (वय 14, रा. रमाबाई आंबेडकरनगर, अंबड) हा दोन मित्रांसोबत दुपारी बारा वाजेच्या सुमाराला वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी उड्डाणपुलालगतच्या समांतर रस्त्याकडून जात होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या मिनी टेम्पोने धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. डोक्यास जबर मार लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, तपासणीनंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सिडकोतील राणा प्रताप चौकातील मुक्तानंद शाळेत सातवीत शिकणार्‍या या विद्यार्थ्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली.

अपघातानंतर संतप्त रहिवासी, व्यापार्‍यांनी पादचारी मार्ग अथवा भुयारी मार्गाची मागणी करीत पुलावरच रास्ता रोको केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, दुर्घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.