आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीवर अाेझं, बसचा पाठलाग, लाेंबकळत प्रवास; तरी अधिकाऱ्यांची फेऱ्या कमी करण्याची मिजास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वाढत्या तोट्याचे कारण देत कोणतेही आदेश नसताना शहरी भागातील बसफेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा, महाविद्यालयाच्या वेळीच बसफेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची कसरत हाेत अाहे. एकतर पाठीवर दप्तराचे अाेझे, त्यात बस स्टाॅपवर थांबता इतरत्र थांबणे वा निघून जाणे असे असतानाही बसचा पाठलाग करत ती पकडणे असा जीवघेणा खेळ विद्यार्थ्यांचा राेजच हाेत अाहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थी वाहतुकीद्वारे एसटीला दर महिन्याला साधारणत: ६० लाख रुपये प्राप्त होत असतानाही एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात अाले अाहे. या प्रकारावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझोत... 
 
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरवणारे एसटी प्रशासन तोट्याच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहे. दर महिन्याला शहरी प्रवासी वाहतुकीमुळे ते कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. वाढता तोटा लक्षात घेता महापालिकेने शहरी बससेवा चालवावी अथवा तोटा भरून द्यावा अशी मागणी एसटी महामंडळाकडून करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वाढता तोटा कमी करण्यासाठी शहरी बसफेऱ्या कमी करण्याचे धोरण एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वीकारण्यात आले. विशेष म्हणजे वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारचे लेखी अादेश नसताना शहरी बसफेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहेत. 

पूर्वी शहरी भागात रोज २२५-२३० बसेसच्या ३५०० बसफेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक केली जात होती. मात्र, वाढत्या तोट्याचे कारण देत बसफेऱ्या कमी करण्यात आल्याने सद्यस्थितीला केवळ १७० बसेसद्वारे शहरी प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र १३० बसेस धावत आहेत. या प्रकारामुळे सामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, कामगारांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या वेळेत उपलब्ध बसेस बोटावर मोजण्याइतपतच असल्याने तासन‌्तास विद्यार्थ्यांना बसथांब्यावर ताटकळत रहावे लागते.
 
थांब्यावर बस आल्यानंतर जीव मुठीत घेऊन जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करत जावे लागते. यात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असतानाही एसटी प्रशासनाकडून या प्रकाराकडे ‘बस बंदच करायची आहे’, या दृष्टीनेच पाहिले जात अाहे. अधिकाऱ्यांच्या या धाेरणामुळे विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ होत असल्याने या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहेत.
 
 
अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर 
शहरी बससेवा महापालिकेने चालवावी याबाबत एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अाग्रही आहेत. मात्र, त्याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. नागरिकांचा रोष वाढावा यासाठीच कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नसताना शहरी बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्येच अाहे. 
 
कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी 
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धाेरणामुळे चालक-वाहकांना प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. बसमध्ये जागा नाही, विद्यार्थ्यांचे होणारे हाल यामुळे अनेकदा प्रवासी कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होऊन थेट हाणामारीचे प्रसंग घडतात. यामुळे प्रशासनाच्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पण, काेणीही कर्मचारी वा संघटना अापली नाराजी उघडपणे व्यक्त करत नसल्याने ही नाराजी म्हणजे केवळ कर्मचाऱ्यांमध्ये अापसातच चर्चा ठरत अाहे. 
 
अपघात घडल्यास जबाबदार कोण? 
बससंख्या कमी, त्यातही प्रवाशांना हव्या त्या वेळेला बसच नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पण, याकडे अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष अाहे. अनेक विद्यार्थ्यांना धावत जाऊन बस पकडावी लागते. यात विद्यार्थी पडतातही. तर विद्यार्थिनींना बस पकडणे अडचणीचे हाेते. बसेसमधून ८० ते १०० विद्यार्थी इतर प्रवासी प्रवास करत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे अपघात घडल्यास त्यास कोण जबाबदार राहील? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
 
आरटीओ विभागाचाही कानाडोळा 
आरटीओने बसमधील प्रवाशांची मर्यादा ठरवून दिली अाहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आरटीओच्या नियमाप्रमाणे बस असली पाहिजे असाही नियम अाहे. मात्र, वाढता तोटा शहरी बस सुरूच ठेवायची नाही असे धाेरण एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारल्यामुळे हे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. अशी परिस्थिती असताना आरटीओ विभागाच्या वतीने या प्रकाराकडे कानाडोळा केला जात आहे. विशेष म्हणजे रिक्षा भरून गेली की कारवाई हाेते, पण बसेसकडे दुर्लक्ष केले जाते. 
 
अशा करण्यात आल्या बसफेऱ्या कमी 
पूर्वीशहरी भागातील २२५ बसेसद्वारे दिवसाला ४७ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक केली जात होती. मात्र बसफेऱ्या कमी केल्याने सद्यस्थितीला १७० बसेसद्वारे ३६ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक हाेत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 
 
27,000 पासधारक विद्यार्थी 
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांची संख्या बघता शैक्षणिक कारणांसाठी पास घेतलेल्या पासधारक विद्यार्थ्यांची संख्या तब्बल २७ हजारांहून अधिक आहे. जुलै महिन्याचा विचार केला तर २७ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी पास काढले. ६० ते ७०० रुपयांच्या पासद्वारे एसटीला दर महिन्याला ६० लाख रुपये प्राप्त होतात. आगाऊ पैसे देऊनही एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांना अशाप्रकारे वाऱ्यावर सोडले असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर...थेट सवाल (यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक) 
 
 
बातम्या आणखी आहेत...