आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर विद्यार्थ्यांने रूग्णालयात दिली दहावीची परिक्षा, रायटरची घेतली मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहावीचा गणिताचा पेपर देण्यासाठी नाशिकरोड येथील के.ए.केला स्कूलमध्ये जात असताना अनिकेत तीर्थरामाणी या विद्यार्थ्यांचा मंगळवारी अपघात झाला. या अपघातात त्याचा पाय मोडल्याने तातडीने त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने रुग्णालयातच गणिताचा पेपर दिला. 
 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी केंद्रावरील पर्यवेक्षक आर.पी.गायकवाड, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी बोर्डाकडे विद्यार्थ्यास रूग्णालयात पेपर देण्याची परवानगी मागितली. बोर्डाने तातडीने परवानगी दिल्याने अनिकेतने रूग्णालयातच गणिताचा पेपर सोडविला. मदतीसाठी एक रायटर व निरीक्षणासाठी एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. उपचार सुरू असेपर्यंत रूग्णालयातून पेपर देण्याची परवानगी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...