आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातग्रस्त विद्यार्थ्याची जिद्द, रुग्णालयातूनच दिली परीक्षा; दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर माेडला होता पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना नाशिकरोड येथील के. एन. केला स्कूलमध्ये अनिकेत तीर्थरामाणी (रा. जेलराेड ) या विद्यार्थ्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचा पाय मोडल्याने तातडीने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बोर्डाने परवानगी दिल्याने लेखनिकाच्या मदतीने अनिकेतने रुग्णालयातच त्याने गणिताची परीक्षा दिली. 
 
नाशिकराेड येथील के. एन. केला स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रात गणिताचा पेपर देण्यासाठी मंगळवारी (दि. १४) अनिकेत तीर्थरामाणी या विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांनी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले. त्याचवेळी या शाळेतील अजिज सय्यद हे आपल्या चारचाकी वाहनांतून (एमएच १५ सीए ८९६१) प्रश्नपत्रिका घेऊन येते होते. 

या चारचाकी वाहनाची धडक बसून अनिकेत तीर्थरामाणी याचा पाय मोडला. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी केंद्र पर्यवेक्षक आर. पी. गायकवाड यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडून या विद्यार्थ्यास रुग्णालयातून परीक्षा देण्याची परवानगी मागितली. मंडळानेही तातडीने परवानगी दिल्याने रुग्णालयातच लेखनिकाच्या मदतीने अनिकेतने गणिताचा पेपर सोडविला. परीक्षेसाठी एका शिक्षकांचीही निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.उपचार पूर्ण हाेईपर्यत रूग्णालयातूनच पेपर देण्याची परवागनी मंडळाने दिली अाहे. अपघात झाल्यानंतही अनिकेतने परिक्षा देण्याबाबत दाखविलेली जिद्द अाणि शिक्षकांनी दाखवलेली तत्परता यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. 
 
अपघात प्रकरणांची पोलिसांकडून दखल : शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या अपघातप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी कर्मचाऱ्यांची अपघातस्थळाची पाहणी केली. 

गणिताचा पेपर गेला सोपा 
गणिताचा पेपरचा अभ्यास चांगला केला होता. रायटरच्या मदतीने पेपर सोडविला, त्यामुळे थोडा वेळ कमी पडला. मात्र, अभ्यास केल्याने पेपर सोपा गेला. -अनिकेत तीर्थरामाणी , विद्यार्थी 
बातम्या आणखी आहेत...