आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, भाेजनात निघतो उंदीर..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात विविध भागांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्था प्रचंड शैक्षणिक शुल्क आकारतात. या शुल्कांमध्ये खानावळीचे शुल्क वेगळे आकारले जाते. असे होऊनही विद्यार्थ्यांच्या भाेजनात चक्क उंदीर पडल्याचे आढळून आले. काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे हजारो रुपयांचे जेवणाचे बिल भरून दाबून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.
हा प्रकार गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खानावळीमध्ये घडला. काही दिवसांपूर्वी जेवणाच्या ताटात चक्क उंदीर पाहण्यात आला. याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘पुढचे तीन दिवस कोणत्याही हॉटेलमध्ये खा, बिल महाविद्यालय देईल’ असे सांगितले गेले. हे प्रकरण थंड झाल्यानंतर काही दिवसांत पुन्हा खानावळीतील भाेजनात झुरळ अळ्या निघू लागल्या. तक्रारीनंतर विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदत मागून घेत महाविद्यालयीन यंत्रणेने हा प्रकार थांबल्यास कॉन्ट्रॅक्टर बदलण्याचे आश्वासन दिले आहे. काही विद्यार्थ्यांनी नाव जाहीर करण्याची विनंती करत ‘दिव्य मराठी’शी संपर्क साधला असे प्रकार वारंवार घडत असल्याचे संागितले. १५० विद्यार्थिनींच्या वसतिगृहामध्ये काही मुलींना ताप पोटाच्या आजारांनी ग्रासले होते. यापैकी काही मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने हे प्रकरण थांबले. परंतु, यावर काय मार्ग काढणार असे विचारले असता, संस्थेच्या विश्वस्तांनी कॉन्ट्रॅक्टरला शेवटची वॉर्निंग दिल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...