आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार विद्यार्थ्यांची नाशकात पावसासाठी प्रार्थना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेले महिनाभर ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी मुंबईवर कृपादृष्टी केली असली, तरी राज्याच्या इतर भागांत मात्र अजूनही त्याची प्रतीक्षाच आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी सकाळी नाशिकमधील रहेनुमा उर्दू शाळेतील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. तसेच पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

मालेगावात जोरदार हजेरी
मालेगाव शहर व परिसरात बुधवारी दुपारी आद्र्राच्या पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या. अखेर बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. सुमारे 20 मिनिटे जोरदार पाऊस झाला. आजवर पाऊस नसल्याने तालुक्यात एक टक्काही पेरणी झालेली नाही. तसेच शहर व परिसरात उन्हाळय़ापासूनच पाणीटंचाईचे भीषण सावट पसरलेले आहे. या पावसाळय़ात तरी हे संकट दूर व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

(फोटो - जुने नाशिकमधील रहेनुमा उर्दू शाळेच्या प्रांगणात बुधवारी पावसासाठी विद्यार्थ्यांनी विशेष प्रार्थना केली)