आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"कृषी' विद्यार्थी आक्रमक; प्राचार्यांना दिले निवेदन, महाविद्यालय बंद पाडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बी.एस्सी.कृषी या अभ्यासक्रमासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमांविरोधात विद्यार्थ्यांनी शहरातील दुलाजीनाना पाटील कृषी महाविद्यालयासमोर बुधवारी एकदिवसीय तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला. नियमांचा फेरविचार करण्यासंबंधी निवेदन प्राचार्यांना दिले.

कृषी विद्यापीठाच्या नियमानुसार या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशासाठी तृतीय वर्षाचे सगळे विषय पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठऐवजी सात वर्षांचाच कालावधी दिला आहे. यांसारख्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला.

चार वर्षांच्या बी.एस्सी. अॅग्री चार वर्षांचा अभ्यासक्रम असून, अंतिम वर्षाला प्रवेशासाठी तिसऱ्या वर्षाचे म्हणजेच पाचव्या आणि सहाव्या सत्राचे विषय उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. ही अट विद्यापीठाने २०१२ पासून लागू केली आहे. या नियमांचा गुणवत्तेवर मोठा परिणाम होईल. एखादा विषय राहिला तरी संपूर्ण वर्षाचे नुकसान होईल, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठऐवजी सात वर्षांत होणे अनिवार्य केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी कमी होत आहेत.

..अन्यथा तीव्र आंदोलन
याआधीपुण्यातील अनेक महाविद्यालयांनी याबाबत निवदने दिली आहेत. मात्र, विद्यापीठाने नियमांवर फेरविचार केल्यास पुण्यात जाऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे या वेळी शहरातील विद्यार्थ्यांनी सांगितले.