आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल नाशिकसाठी विद्यार्थ्यांचा हवा संशोधनात सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नवनिर्मितीची संस्कृती रुजवण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक शहराला अॅडव्हान्स आणि डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनाला हातभार लावावा, असे आवाहन एमआयटी (बाॅस्टन) मीडिया लॅबचे प्रमुख डॉ. रमेश रास्कर यांनी केले.
गंगापूररोड येथील मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘कुंभथॉन ३’च्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात शनिवारी रास्कर बोलत होते. या वेळी लॅबचे डॉ. प्रतीक शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य जे. टी. पट्टीवार, मविप्रचे शिक्षणाधिकारी आय. एम. चौधरी, ‘कुंभथॉन ३’चे संस्थापक संदीप शिंदे उपस्थित होते. रास्कर पुढे म्हणाले, ‘आगामी काळात नाशिकमधील दुकाने आणि व्यावसायिकांची माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार असून त्याचे नेटवर्किंग केले जाणार आहे. कुंभमेळ्यात कुंभथॉनची टीम संशोधन करणार असून, या शोध निबंधांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण होणार आहे.’
पट्टीवार म्हणाले, की कुंभमेळ्यादरम्यान अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून, अशा घटना टाळण्यासाठी संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रास्कर यांनी उत्तरे देत त्यांच्या शंकाचे निरसन केले.
बातम्या आणखी आहेत...