आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी उष्ण पाण्याची सुविधा, गिरणारे येथील वसतिगृहाला अाॅल इज वेल ग्रुपतर्फे साेलर वाॅटर हिटर भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: कडाक्याच्या थंडीचा सामना करणे शहरातील व्यक्तींनाही अवघड होत चालले आहे. अशा परिस्थितीत गिरणारे येथील विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गार पाण्यानेच स्नान करावे लागत अाहे. ही समस्या लक्षात घेत ‘ऑल इज वेल ग्रुप’च्या सदस्यांनी त्यांची ही अडचण कायमची दूर केली. या संस्थेने एक हजार लिटर क्षमतेचे सोलर वॉटर हिटर बसवून देत या मुलांना आता गरम पाण्याचा पुरवठा हाेणार अाहे.
 
या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये कुणाला आई आहे तर वडील नाहीत, तर कुणी अनाथ आहेत. अशा स्थितीतही शिक्षणाची कास धरलेल्या या मुलांच्या विकासासाठी ‘ऑल इज वेल’ हा ग्रुप विविध उपक्रम राबवितअसतो. दिवाळी आली की या मुलांसाठी नवीन कपडे, मिठाई, फटाके घेतले जातात. शाळा सुरू झाली की शाळेचा गणवेश, वह्या सर्व शैक्षणिक सामग्री या विद्यार्थ्यांना विनासायास उपलब्ध केली जाते.
 
 गिरणारे गावातील या वसतिगृहात आदिवासी भागातील पाचवी ते दहावीची जवळपास ६० मुले शिक्षण घेत अाहेत. घरच्या हलाखीच्या परिस्थितीने त्यांना दोन वेळचे जेवण दुरापास्त असताना शिक्षण हे त्यांच्या गावीही नसावे. मात्र, ऑल इज वेल ग्रुपचे श्याम कसबे, किशोर माने, विजूनाना थेटे, दीपक चव्हाण, रवी पवार, रोहित पगार, योगेश पाटील, नितीन हांडगे, संदीप ठाकरे, दिलीप निकम यांनी स्वखर्चाने अशा मुलांना या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून दिली.
 
मराठा विद्या प्रसारक मंडळ या मुलांचा जेवणाचा खर्च उचलते. ही बाब या मुलांची काळजी घेणारे आणि त्यांना अध्यात्माच्या वाटेने घेऊन जात असलेले नवनाथ महाराज थेटे यांचा सक्रिय सहभाग असल्याचेही ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. 
 
अाॅल इज वेल या ग्रुपमध्ये बांधकाम व्यावसायिक, विकासकांसह प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश अाहे. या सदस्यांमध्ये बहुतांशी सदस्य हे काही वर्षांपूर्वी अापल्या स्वत:सह कुटुंबीयातील मुलांचा वाढदिवस असला की माेठ्या हाॅटेलमध्ये पार्टी देऊन साजरा करायचे.
 
कुठलाही सण, उत्सव असला की त्याला वेगळेच स्वरूप देऊन त्यावर खर्च केला जायचा. मात्र, ग्रुपचे संस्थापक श्याम कसबे अाणि किशाेर माने यांनी या सदस्यांचे मनपरिवर्तन करीत या अाश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारायला लावले.
 
या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येकाच्या वाढदिवसाला मिठाईसह भाेजनदेखील उपलब्ध करून देतात. त्यांच्या या उपक्रमाने ग्रुपच्या सदस्यांनी घरातील वाढदिवस असाे की वडीलधाऱ्यांच्या श्राद्धविधीचा खर्चदेखील याच ठिकाणी देऊन विद्यार्थ्यांना तृप्त करीत अनाथांचे खऱ्या अर्थाने अाधार बनले अाहेत.