आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्ड नोंदणीसाठी विद्यार्थी, पालकांची परवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शाळांकडूनविद्यार्थ्यांच्या आधार कार्डची मागणी होत असल्याने नोंदणीसाठी केंद्रावर गेलेल्या विद्यार्थी पालकांची साेमवारी (दि. २०) प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे चांगलीच परवड झाली. एका दिवसात एका किटद्वारे ५० जणांचीच नोंदणी होत असल्याने पहाटे वाजेपासून केंद्राबाहेर रांग लावून बसलेल्या अनेकांना हात हलवत परतावे लागल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात अाला. गेल्या अाठवडाभरापासून अशीच परिस्थिती असल्याची तक्रार पालकांनी केली. दरम्यान, प्रशासनाने अधिक किट उपलब्ध करून तीन-चार दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे अाश्वासन दिले आहे.

अंगणवाडी शाळकरी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्राधान्याने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शाळाही सक्रिय झाल्या असून, विद्यार्थ्यांची नोंदणीसाठी आधार केंद्रांवर गर्दी होत आहे. परंतु, एका कार्डच्या नोंदणीसाठी १० ते १२ मिनिटांचा कालावधी लागत असल्याने दिवसभरात केवळ ५० जणांचीच नोंदणी होते. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी पालक रांगेत उभे असतात. केंद्रचालकांनी ५० पेक्षा जास्त जणांची नोंदणी होणार नसल्याचे सांगितल्याने पालक दुसऱ्या दिवशी क्रमांक लागण्याची अाशा घेऊन परतत अाहेत.
मेनरोडवरीलकेंद्रावर दररोज गर्दी : मेनरोडयेथील आधार नोंदणीच्या केंद्रावर एकच किट आहे. मात्र, तेथे गर्दी होत असल्याने अनेकांची नाेंदणीच हाेत नाही. विद्यार्थ्यांची शाळेतही अनुपस्थिती लागते ती वेगळीच. केंद्रचालक आपली हद्द कोणती, याची माहितीही अगदी नंबर आल्यावरच सांगत असल्याने वाद होत असल्याचे चित्रही या केंद्रावर दिसून येत आहे. राजीव गांधी भवन आणि पंडित कॉलनीतील केंद्रावरही तीच परिस्थिती अाहे.
सध्या६५ किट आहेत. मात्र, आता जालन्यातून गुजरात इन्फोटेक कंपनीचे १५ किट दोन-तीन दिवसांत उपलब्ध होतील. ठाण्याचीही एक कंपनी २० किट देणार आहे. सेतूधारकांचेही १० किट आहेत. अंगणवाडी, शाळांमध्येच नोंदणी होणार असल्याने पालकांनी इतरत्र गर्दी करू नये. ३-४ दिवसांत प्रश्न निकाली निघेल. जिल्ह्यात ८५ टक्के नोंदणीही झाली आहे.
नीलेशजाधव, उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आज नोंदणी
आधारनोंदणीची वाढती मागणी आणि जिल्हािधकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांचीही नोंदणी अद्याप बाकी असल्याने मंगळवारी (िद. २१) जिल्हाधिकारी कार्यालयातच नोेंदणी केली जाणार आहे. येथे एका किटची व्यवस्था केली जाणार आहे.
दाेघांची गैरहजेरी

मीदोन दिवसांपासून सकाळीच मुलीच्या आधार नोंदणीसाठी मेनरोडच्या केंद्रावर जातो. दोन दिवस मुलीची शाळेला आणि माझीही कामावर गैरहजेरी लागत आहे. मात्र, नोंदणी झालेली नाही. किट वाढवण्यासह या केंद्राच्या हद्दीतील ठिकाणांची यादी लावणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरशेलार, त्रस्त पालक

दीर्घ प्रतीक्षेनंतरही अाधार नाेंदणी झालेल्या पालकांची केंद्राच्या अावारात झालेली गर्दी.
किट शिक्षण मंडळाकडे देणार

इतरजिल्ह्यांतून देण्यात येणारे आधार कार्डचे १५ किट पालिकेच्या शाळांसह इतर शाळांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत. पालकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर, शाळांनीही आधार कार्डसाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

किटची टंचाई
एकाकेंद्रावर जर दिवसभरात ५० जणांचीच नोंदणी होत असेल आणि तेथे १०० जण दररोज गर्दी करीत असतील तर अशा केंद्रावर प्रशासनाने एकापेक्षा अधिक किटची व्यवस्था करावी. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळू शकेल. प्रत्यक्षात तसे होत नसल्यानेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

...अाता शाळेतच नोंदणी करण्याचा सल्ला
विद्यार्थ्यांचीअंगणवाड्या आणि शाळांमध्येच नोंदणी केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक शाळेत किट उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यामुळे महापालिका किंवा शहरातील प्रत्येक शाळेत आधारची नोंदणी होणार अाहे. विद्यार्थ्यांनी बाहेरील केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यात वेळ घालवि‌ण्यापेक्षा आपल्या शाळेत नोंदणी सुरू झाल्यानंतरच तेथेच नोंदणी करावी, असा सल्ला अाता प्रशासनाने दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...