आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’ बंदने विद्यार्थी पालक त्रस्त, सकाळपासून केंद्रांवर रांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आधार कार्ड केंद्र एजन्सीच्या कर्मचाऱ्यास शुक्रवारी नागरिकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करत आधार एजन्सीने शनविारी दविसभर शहरातील सर्व केंद्रे बंद ठेवली होती. केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जोपर्यंत सुरक्षारक्षक नेमण्यात येत नाही तोपर्यंत आधार कार्ड केंद्र बंद राहील, असा इशारा आधार एजन्सीकडून देण्यात आला आहे. शनविारी अनेक कर्मचाऱ्यांना शाळांना सुटी असल्यामुळे आधार कार्ड नोंदणीसाठी केंद्रावर आलेले शेकडो पालक विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. यामुळे आधार केंद्रांसह आधार कार्ड एजन्सीच्या कार्यालयात नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. याबाबत ‘दवि्य मराठी’च्या चमूचा हा लाइव्ह रिपोर्ट...

वेळ-सकाळी ते दुपारी १२ वाजता
कंपनीकर्मचाऱ्यांचा महिन्याचा शेवटचा शनविार त्यातच शाळेलाही सुटी असल्याने हा आधार कार्ड नोंदणीसाठी चांगला दविस असल्याचे समजून सकाळी वाजता शहरातील पालिकेच्या विभागीय कार्यालयात पालकांची गर्दी आणि काही तासानंतर आज केंद्र उघडणारच नाही, असे समजताच उडालेला एकच गोंधळ हे दृश्य शनविारी पालिकेच्या विभागीय कार्यालयांत दिसले.
शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची मागणी होत असल्याने नोंदणीसाठी केंद्रावर एका दविसांत एका किटद्वारे ५० जणांचीच नोंदणी होत आहे. शनविारी या नोंदणीसाठी पहाटेपासूनच केंद्राबाहेर रांग लावून बसलेल्या अनेक पालकांना हात हलवत परतावे लागल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. तर, सकाळपासून रांगेत उभे राहून आधार कार्ड बंद असल्याचे सांगण्यात आल्यानंतर काही संतप्त पालकांनी आधार एजन्सीच्या कार्यालयात गर्दी केली आधार नोंदणीची मागणी एजन्सी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याने एजन्सीच्या वतीने या नागरिकांची नोंदणी सुरू करण्यात आली. तर, दुसरीकडे सिडको, नाशिकरोड, मेनरोड पंचवटीतील आधार केंद्र दविसभर बंदच ठेवण्यात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
नोंदणीच नाही

- दोनदविस मुलीची शाळेला गैरहजेरी लागत आहे. त्यामुळे आज सुटीचे दविशी सकाळी वाजेपासून आधार नोंदणीसाठी आधार केंद्रावर आलो होतो. मात्र, आधार केंद्रात नोंदणी झाली नाही. सचिनगावळे, त्रस्तपालक

सक्ती नको...
शहरातीलप्रत्येक शाळा अचानक आधार कार्ड सक्तीचे करून दोन-तीन दविसांची मुदत देऊन आधार कार्ड नोंदणीची सक्ती केली जात आहे. शाळांनी अशी सक्ती करू नये. प्रिया पांगम, त्रस्तपालक

शिबिर घ्यावे
शाळेत आधार नोंदणीसाठी शिबिर घेण्यात येणार असल्याचे समजल्याने आम्ही शाळेत याबाबत विचारणा केली असता असे शिबिर नसल्याचे सांगण्यात आले. शाळांनी असे शिबिर घेण्याची गरज आहे. अनंतआव्हाड, पालक

सुरक्षारक्षक मिळेपर्यंत केंद्र बंदच राहणार
मेनरोड,नाशिकरोड, पंचवटी या आधार केंद्रांवर वारंवार कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात आहे. या संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडे सुरक्षा रक्षकांची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत सुरक्षारक्षक मिळत नाही, तोपर्यंत आधार केंद्र बंदच ठेवण्यात येणार आहे. शहनवाजशेख, व्यवस्थापक,कार्वी डेटा मॅनेजमेंट

शाळा व्यवस्थापनानेही झटकले हात...
विद्यार्थ्यांसाठीअंगणवाड्या आणि शाळांमध्येच शिबिर घेऊन नोंदणी करावी. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक शाळेत किट उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यामुळे महापालिका किंवा शहरातील प्रत्येक शाळेत आधारची नोंदणी होणार आहे. मात्र, प्रशासनाच्या या सूचनांकडे शाळेकडून दुर्लक्ष केले जात असून, दोन दविसांच्या आत आधार कार्ड नोंदणी करण्याची सक्ती शाळेकडून केली जात आहे. त्यामुळे गर्दीत आणखी भर पडली आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पालकांचे हाल...
जिल्हाप्रशासनाच्या वतीने आधार कार्डचे १५ किट पालिका शाळांसह इतर शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र, ते उपलब्ध झाल्याने शाळांनीही आधार कार्डसाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावल्याने आधार कार्ड नोंदणीसाठी गर्दी झाली. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मात्र नागरिकांचे हाल होत आहेत.

प्रचंड हाल झाले...
शनविारी शाळेला कंपनीला सुटी असल्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील आधार केंद्रावर सकाळी वाजेपासून रांगेत उभा होतो. मात्र, केंद्र बंद असल्यामुळे तीन तास प्रचंड हाल झाले तसेच सुटीचा दविसही यामुळे वाया गेला. मनोजसुर्वे, त्रस्तपालक