आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन महिन्यांत २८ हजार दाखले वितरित, स्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांची प्रकरणे पडून असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे नाशिक शहर हद्दीत तीन महिन्यांत २८ हजार ३० दाखले निकाली काढून त्यांचे वितरण करण्यात अाले अाहे. तर, तीव्र मागणी होत असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांबाबत मात्र उलट चित्र निर्माण झाले असून, जातीनिहाय स्वतंत्र उपजिल्हाधिकारी नियुक्त करूनही हजार २१९ इतकेच दाखले शहरातील सेतूद्वारे निकाली निघाले आहेत.
प्रशासनाने थेट प्रत्येक जातीच्या दाखल्यावरील स्वाक्षरीसाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी रमेश काळे, विठ्ठल सोनवणे, उदय किसवे, गीतांजली बाविस्कर असे चार उपजिल्हाधिकारी नेमले आहेत. त्यामुळे जून महिन्यात १०२ आणि मेमध्ये ५५८ दाखलेच वितरित करण्यात आलेल्या शहरी सेतूतून जून महिन्यात तब्बल १५५९ दाखले वितरित झाले आहेत. शिवाय, ३१ जुलैपर्यंत या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याने नाशिक प्रांत हद्दीतील जातीचे सर्वच दाखले निकाली निघण्याचीही शक्यता आहे. याव्यतिरिक्त नॉन क्रीमी लेअरच्या दाखल्यांसाठी ५-६ उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने हजार ५५२ दाखले तीन महिन्यांत तयार झाले. तर, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचीही स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्रही हजार ४९४ आणि उत्पन्नाची सर्वाधिक दाखले १७ हजार ७६५ वितरित करण्यात आली आहेत.

दाखले वितरणास प्राधान्य
^विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी दाखले वितरणास प्राधान्य देेण्यात आले होते. जातीच्या आणि नॉनक्रीमी लेअरच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी, तर इतर दाखल्यांसाठी तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळत आहेत. -रामदास खेडकर, निवासी
उपजिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...