आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला हजर विद्यार्थी गुणपत्रकात गैरहजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वार्षिक परीक्षेला विद्यार्थी हजर असताना आणि त्याने परीक्षा दिलेली असतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालपत्रात मात्र थेट गैरहजरच नमूद करत विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. पेपर देऊनही गैरहजर आणि नापासचा निकाल आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, कुलगुरूंनी मात्र संबंधित महाविद्यालयांवरच थेट कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

पुणे विद्यापीठाने नुकतेच निकाल जाहीर केले. त्यात अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेचे गुण अशी गुणांकन पद्धती लागू केली आहे. त्यात माैखिक किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण हे महाविद्यालयांकडूनच विद्यापीठाला पाठविले जातात. त्यानुसार, विद्यापीठ निकाल जाहीर करते. २०१५च्या निकालांमध्ये एम. ए. आणि एम. कॉम., एम.एस्सी. आणि अभियांत्रिकीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यात महाविद्यालयांकडून पाठविण्यात येणाऱ्या गुणांमध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत. अनेक गुणपत्रकांमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असतानाही गुणपत्रकात गैरहजर प्रिंट झाले आहे. विद्यापीठ महाविद्यालयांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांवर नापासचा शिक्का बसत असून, दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचीही वेळ विद्यार्थ्यांवर आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, विद्यार्थी संघटनांनीही त्यात सुधारणा झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शुल्कभरूनही परीक्षा नाही : २०१३मध्ये आनंद सोनवणे या एम. कॉम.च्या विद्यार्थ्याने प्रथम वर्षाची फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयाची इंटरनल परीक्षा दिली. त्यात तो नापास झाला. त्यानंतर त्याने सतत दुसऱ्या, तिसऱ्या चौथ्या सत्रातही परीक्षेचे शुल्क भरले असतानाही संबंधित शिक्षक विभागप्रमुखांनी त्याची परीक्षा घेतलीच नसल्याने तो नापास झाला आहे.

..तर तीव्र अांदाेलन
विद्यापीठ काॅलेजकडून वारंवार या चुका घडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यासह त्यांची मानसिकताही बिघडत आहे. त्यामुळे या चुका त्वरित दुरुस्त केल्यास आम्ही विद्यापीठातच तीव्र आंदोलन करू. अजिंक्य गिते, विद्यार्थी संघटना प्रतिनिधी

गुणांमध्ये चुका तरीही संबंधितांना अभय
महाविद्यालयांकडूनपाठविलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांमध्ये झालेल्या चुका या महाविद्यालयांच्याच अाहेत, असे असतानाही महाविद्यालयांकडून चुका करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. शिवाय, विद्यापीठही के‌‌वळ कारवाईचा इशाराच देत असून, कारवाई मात्र शून्य असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.

कठाेर कारवाई करू
अंतर्गत मूल्यमापन गुणाची माहिती काॅलेजकडून पाठविली जाते. ती एकत्र करून विद्यापीठ गुणपत्रक तयार करते. तरीही यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई काॅलेजवर कारवाई केली जाईल. -डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरू,पुणे विद्यापीठ