आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंपळगावला संविधानदिनी विद्यार्थ्यांचे सामुदायिक गायन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव- भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना व्यापक स्वातंत्र्य दिले असून, संविधानाचे अनुकरण अनुपालन व्हावे. शाळा-महाविद्यालयांतून संविधानाचा प्रचार-प्रसार व्हावा, असे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेच्या बी. पी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात अाला. 


अध्यक्षस्थानी प्रा. दिनेश अनारसे होते. शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. राहुल बच्छाव, समाधान घोडेस्वार, चेतन गांगुर्डे उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. जी. मोरे, नितीन डोखळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले. ‘संविधान ज्ञान’ परीक्षेत वैष्णवी परदेशी (प्रथम), तेजस मोरे (द्वितीय), ऐश्वर्या गवळी धनश्री ठोंबसे (तृतीय) या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात अाला. 


गोखले एज्युकेशन सोसायटी शाळेच्या आवारात संविधान दिनानिमित्ताने मुंबई आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहताना विद्यार्थी. याप्रसंगी ‘हम सब भारतीय है’ हे एनसीसी सामुदायिक गायन करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, रामराव डेरे, साहेबराव शिंदे, प्राचार्य नीता तकतराव, अंजू चव्हाण उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...