आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वधू-वराला आशीर्वादाचा, विद्यार्थ्यांना हात मदतीचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दैनंदिन आयुष्यात विविध अडचणींचा सामना करावा लागणार्‍या अंध वधू-वराच्या आयुष्यात रविवार मात्र प्रकाशमान ठरला. संसाराच्या वाटेवर निघालेल्या या नवदांपत्याला शेकडो मान्यवरांचे आशीर्वाद लाभले. निमित्त होते, दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन यांच्यातर्फे आयोजित सोहळ्याचे.

रविवारी नाशिक-पुणेरोडवरील श्रीकृष्ण लॉन्स येथे झालेल्या या सोहळ्यात वनिता शिंदे व संतोष अदगर यांचा विवाह मोठ्या उत्साहात झाला. या वेळी प्रमुख उपस्थिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता (मुंबई) उल्हास देबडवार, बँक आॅफ महाराष्ट्रचे नाशिक विभागाचे महाप्रबंधक राजन लोंढे, उद्योजक किशोर खाबिया, संरक्षण विभागातील शिखा. एस. दत्ता उपस्थित होते. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता सुजाता नागरे, ठाणे मेट्रो रोटरी क्लबच्या मंगला करंदीकर, इनरव्हील ठाणे संस्थेच्या साधना वझे, मराठा मुद्रा महिला मंडळाच्या प्रतिभा होळकर, प्रतिभा पाटील, शीतल जगताप, शिल्पा गायकवाड, आश्विनी न्याहारकर आदी उपस्थित होते.

या वेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन, संतोष नाठे यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी केले. संस्थेचे कार्य मी जवळून पाहतो आहे, असे सांगत उल्हास देबडवार यांनी संस्थेने यापुढेही असे उपक्रम कायम ठेवावेत व आगामी काळात संस्थेने व्यापक स्वरूप द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

खाबिया यांनी आपल्या परिचयातून ग्रुपतर्फे संस्थेकडील प्लॉटवर बांधकाम करून अंधांना स्वयंरोजगार मिळेल यादृष्टीने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. पुनर्वसनदेखील तितकेच गरजेचे आहे. तर लोंढे यांनीदेखील बँक सदैव सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी किमान पाच टक्के अधिक गुण मिळवावेत, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या मानद अध्यक्षा कल्पना पांडे, डॉ. विजय घाडगे, महासचिव दत्ता पाटील, कोषाध्यक्ष विजया दबे व मेघा पिंपळे यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री कृष्ण लॉन्स नि:शुल्क देण्यात आले होते.
92 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान सोहळादेखील आयोजित करण्यात आला होता. या वेळी 92 दृष्टिहीन विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.