आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनविभागाच्या परीक्षेत मोकळे ‘रान’; एका बाकावर तीन-तीन परीक्षार्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वनविभागाने सहा पदांसाठी ही लेखी परीक्षा आयोजित केली होती. बी. डी. भालेकर शाळेत दुपारी 12 ते 2 या वेळेत लेखापाल पदासाठी परीक्षा होती. निव्वळ चार पदांसाठी जवळपास 1200 अर्ज आले होते. उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेऊनही पुरेसे नियोजन न झाल्यामुळे ऐनवेळी पर्यवेक्षक व रक्षकांची धावपळ सुरू झाली. सर्वसाधारणपणे एका बाकड्यावर एक परीक्षार्थी बसवणे अपेक्षित असताना, चक्क तिघांना बसवल्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष वाढू लागला. त्यात उमेदवारांची समजूत काढण्याचे सोडून पर्यवेक्षक व रक्षकांनी, ‘परीक्षेला बसायचे तर बसा, नाही तर बाहेर जा,’ असे सांगितल्यामुळे संयमाच बांधच फुटला. त्यातून उमेदवारांनी वनविभागाच्या धिक्काराच्या घोषणा देत प्रांगणातच ठिय्या मांडला.

अशुद्धलेखन, विसंगत पर्याय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या स्थळाला चैत्यभूमी असे उत्तर अपेक्षित असताना शुद्धलेखनामुळे तयार झालेले पर्याय भलतेच विसंगत होते. तंबाखूमध्ये धोकेदायक रसायन ‘निकोटीन’ असताना येथे ‘निकोटन’ असा पर्याय होता. अरबी समुद्राला मिळणारी नदीचा पर्याय ‘सतलज’ऐवजी ‘सलतज’ असा होता. 22 क्रमांकाच्या प्रश्नात 60 फूट लांब व 45 फूट रुंदीच्या मंगल कार्यालयासाठी किती फरशा लागतील, असे विचारले होते. मात्र, फरशीचा आकार किती असेल, याचे प्रमाणच नसल्यामुळे गोळाबेरीज कशाच्या आधारावर करायची, असा प्रश्न आहे.

वनविभागाकडून नियमभंग
प्रश्नपत्रिकेवर वनविभागाने जे नियम परीक्षार्थींसाठी घालून दिले होते, त्याचा भंगही त्यांनीच केला. मुळात परीक्षार्थींना स्वतंत्र बसण्यासाठी जागा नसल्यामुळे कॉपी करू नये, असा नियम फोल ठरला. एकमेकांशी चर्चा करून उमेदवार पेपर सोडवत होते. तसेच विद्यार्थी, भ्रमणध्वनीवरून उत्तरे जाणून घेत होते. आंदोलन सुरू असल्यामुळे अनेक वर्गांवर पर्यवेक्षकच नव्हते. काही पर्यवेक्षक पोर्चमधून आंदोलन बघत बसले.

‘अभाविप’कडून घोषणाबाजी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भालेकर शाळेत जाऊन आंदोलन केले. घोषणाबाजी करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांच्याकडे केली. उमेश पाटील, सागर कंकरेज, महेंद्र भोये यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
अशी आहेत पदे
04 लेखापाल
04 सव्र्हेअर
64 वनरक्षक
06 रखवालदार
04 शिपाई
01 वाहन स्वच्छक
पॅसेजमध्ये परीक्षा
परीक्षा की निव्वळ पोरखेळ
0 जी. साईप्रसाद यांनी प्रश्नपत्रिका सेट करण्यात वेळ गेल्याचे सांगितले खरे; मात्र त्यातील त्रुटींवर उमेदवारांनी आक्षेप घेतले.
0 प्रश्नपत्रिकेत चुका दुरुस्त करण्यासंदर्भात प्रश्न व पर्याय इंग्रजीत होते. मात्र, दहाव्या प्रश्नानंतर सामान्यज्ञानाचे प्रश्न मराठीत दिले होते.
0 काही गणिताचे प्रश्न इंग्रजीत तर काही मराठीत होते. बुद्धिमत्तासंदर्भातील संमिर्श प्रश्नही त्यातच होते.
0 गणिताच्या प्रश्नानंतर पुन्हा सामान्यज्ञान व त्यानंतर पुन्हा गणित, बुद्धिमत्ता असा क्रम थक्क करून सोडणारा होता.
0 नियमित परीक्षार्थींची क्षमता 25 असताना 100 हून विद्यार्थी परीक्षा देत होते.
0 या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिकेत अशुध्द असा मजकूर होता तसेच विसंगत मुद्दे होते.
मुख्य वनसंरक्षकांची नाराजी आणि हतबलता
मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांना उमेदवारांचा गोंधळ सुरू असल्याचे कळताच त्यांनी बी. डी. भालेकर येथील परीक्षा केंद्र गाठले. येथील स्थिती पाहून साईप्रसाद यांनी कपाळावर हात मारून घेतला. कोंदड जागा, बसायला नीट जागाही नाही, केटर्सच्या टेबलवर उमेदवारांची परीक्षा सुरू असल्याचे बघून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अखत्यारितील नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. साईप्रसाद यांनी परीक्षा रद्द करावी, यासाठी उमेदवारांचा जवळपास तासभर गोंधळ सुरू होता.

कोणी परीक्षा केंद्र देईल का?
वनविभागाला 13 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याचे फर्मान मिळाल्यानंतर तयारीला अवधी मिळाला नसल्याचे साईप्रसाद यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना कबूल केले. नागपूरच्या प्रधान वनसंरक्षक कार्यालयाकडून वेळापत्रक मिळाल्यानंतर परीक्षा केंद्रच उपलब्ध होत नव्हते. केटीएचएम येथील परीक्षा केंद्र मिळत नसल्यामुळे इतरत्रही चाचपणी केली मात्र, रूटीन कामकाजाचा दिवस असल्यामुळे परीक्षा केंद्रच उपलब्ध होत नसताना बी. डी. भालेकर येथील सुरक्षा व्यवस्था बघून परीक्षा केंद्रांची निवड केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.