आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा नियोजनात विद्यार्थ्यांचाही पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुं भमेळ्या अारोग्य, अस्वच्छता यांसह वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण पडणार आहे. अशा अडचणी प्रशासनासमोर उभ्या राहणार आहे. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून के. के. वाघ इंजिनिअरिंग मविप्र इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणींचे सर्वेक्षण हे विद्यार्थी करीत असून, अहवाल प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.

कुंभमेळा काळात लाखांेच्या संख्येने देशविदेशातून भाविक शहरात दाखल होणार असून, यामुळे प्रमुख गर्दीच्या ठिकाणी विशेषत: गोदाकाठ परिसरात अस्वच्छता, अारोग्याच्या प्रश्नांसह वर्दळही वाढणार असल्याने वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. सिंहस्थात गोदावरी प्रदूषणमुक्त स्थितीत पार पडावी, लोकांमध्ये याबद्दल जागृती व्हावी, तसेच या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाला नियोजनात मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून टीसीएस कंपनीत इंटर्नशीप करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ५० विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी गटागटाने प्रमुख ठिकाणी स्वच्छतेसाठी, अारोग्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याबाबतचे सर्वेक्षण करत आहेत. गोदाघाटावर खास निळ्या रंगाच्या वेशभूषा केलेले हे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सर्वेक्षणासोेबतच भाविकांचे प्रबोधनही
याउपक्रमात सहभागी विद्यार्थी प्रमुख ठिकाणांचे सर्वेक्षण करताना अस्वच्छता पसरविणाऱ्या नाागरिकंाचेही प्रबोधन करून स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करत आहेत.
टीसीएस कंपनीच्या माध्यमातून के. के. वाघ मविप्र संस्थेच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी शहरातील प्रमुख ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रशासनास मदत करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...