आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींनी जपावी संस्काराची शिदाेरी, डाॅ. कामिनी मुठेंचे गुणगाैरव साेहळ्यात प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शाळेत मिळालेली संस्काराची शिदाेरी विद्यार्थिनींनी अायुष्यभर जपावी, असे प्रतिपादन शाळेच्या माजी विद्यार्थिनी डाॅ. कामिनी मुठे यांनी केले. श्रीमती र. ज. चाैव्हान गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनींच्या गुणगाैरव समारंभाप्रसंगी डाॅ. मुठे बाेलत हाेत्या.

व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्षा मीनाक्षी गाेळे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी, सहसचिव साहेबराव म्हस्के उपस्थित हाेते. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मुग्धा कुलकर्णी यांनी शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल सर्वांचे काैतुक केले. शालेय समिती अध्यक्षा मीनाक्षी गाेळे यांनी विद्यार्थिनींनी शाळेच्या सदैव संपर्कात राहून सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शालांत परीक्षेत या शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली ईश्वरी धाेंडगे, द्वितीय अदिती पाेपळघट यांनी सत्काराला उत्तर दिले. मुख्याध्यापिका छाया वाणी यांनी प्रास्ताविक, तर मुग्धा जाेशी यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन राधिका गायकवाड, शुभांगी देवळे यांनी केले. कार्यक्रमात उषा परांजपे यांच्या अबाेली काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात अाला. या गुणगाैरव साेहळ्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक उपस्थित हाेते.