आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students To Be Rational, Listen Inner Voice Dr.Parikh

विद्यार्थ्यांनो, विवेक जागृत ठेवा, अंतर्मनाचे एेका : डॉ. पारिख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगभरात मूलतत्त्ववादाने पुन्हा डोके वर काढले आहे. वंश, धर्म, जात, वर्ण आणि लिंगभेदाच्या नावाखाली माणसे एकमेकांशी अविचारी, क्रूरतेने वागत आहेत. सत्तेच्या आड येणाऱ्या आणि वेगळा विचार मांडणाऱ्या लोकांविरुद्ध धर्मांध नेते हिंसेला प्रोत्साहन देत आहेत. अशा दहशतीच्या अन् भयग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांनो पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि माणुसकी टिकवण्यासाठी विवेक जागृत ठेवून आपल्या अंतर्मनाचे ऐका, तुमच्या हातून चांगला बदल घडेल, असे आवाहन कॅनडाच्या ए. डी. आय. रिसर्च अॅण्ड रिसर्च कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या शैक्षणिक नियोजनाचे सल्लागार प्रा. डॉ. वास्तुपाल पारिख यांनी येथे व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २२व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पारिख बोलत होते. या प्रसंगी वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बेजबाबदार वर्तनामुळे वाढलेल्या प्रदूषणाने धोकादायक अशा हवामान बदलांना पृथ्वी सामोरी जात आहे. पृथ्वीला सावरण्यासाठी तंत्रज्ञानाचा विधायक वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
वेगळा विचार करा
अपयशाने खचून जाता ते तुम्हाला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करून योग्य मार्ग दाखवते. निग्रही आणि शिस्तबद्ध बनवते. विपरीत परिस्थितीत तग धरून राहण्याची आपली क्षमता वाढवते. त्यामुळे यशाचे शिखर गाठण्यासाठी वेगळा विचार करण्याचे धाडस अंगी बाळगा. नवीन शोधायचे साहस करून अनवट वाटावरून मार्गक्रमण केल्यास यशाचे उंच शिखर नक्कीच पादाक्रांत होईल, असेही डॉ. पारिख म्हणाले.