आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याचे वैदिक शेतीवर अनोखे संशोधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ऋग्वेद, यजुर्वेद, कौटिलीय अर्थशास्त्र, अथर्ववेद, भगवद्गीता तसेच कृषी पाराशर यांसारख्या प्राचीन संस्कृत वाङ्मयांमध्ये अंतर्भूत असलेल्या श्लोकांमध्ये शेती कशी करावी इथपासून शेतीविषयक विविध तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे.
मात्र प्राचीन वाङ्मय असल्याने हे तंत्रज्ञान वा पद्धती जुनाट व कालबाह्य आहे असेच गैरसमज मोठ्या प्रमाणात आढळतात. अभिषेकने प्राचीन वाङ्मयातील शेतीची पद्धत कशी आजही सुसंगत आहे यावर संशोधन केले आहे.
यज्ञ आणि पावसाचा संबंध
पूर्वी केल्या जाणा-या यज्ञाची आजही विज्ञाननिष्ठ पातळीवर गरज असल्याचे अभिषेकचे संशोधन सांगते. यज्ञातून निघणारा इथॅलिन आॅक्साइड प्रोपीलीन अ‍ॅसीटीलीन हे वायू भवतालचे वातावरण प्रदूषणमुक्त करतात, जलशुद्धी करते त्यामुळे पावसास पोषक असे वातावरण निर्माण होते असा विज्ञाननिष्ठ असा पावसाचा व यज्ञाचा संबंध आहे, जो शेतक-यांनी अमलात आणल्यास प्रदूषणामुळे न पडणा-या पावसामुळे निर्माण होणारा दुष्काळ बहुतांश प्रमाणात कमी होऊ शकतो असे अभिषेकने आपल्या संशोधनात नमूद केले आहे.


न्यू जर्सीत अग्निहोत्र संस्था
०अमेरिकेमध्ये न्यू जर्सी येथे अग्निहोत्र नावाची संस्था तिथे यज्ञविषयक प्रचार आणि प्रसार करते आहे. ही संस्था वेदांमध्ये सांगितलेल्या खालील बाबींचा वैज्ञानिक पातळीवर आधुनिक स्वरुपात प्रसार करते.
०यज्ञामुळे स्वच्छ आणि शुद्ध प्राणवायू प्राप्त होतो.
०पर्यावरणातील प्रदुषणाचे प्रमाण कमी होते.
०ऋग्वेद आणि अथर्ववेदात नदी, तलाव आदी यांचे पाणी शुद्ध करण्यासाठी यज्ञाची आवश्यकता आहे असे सांगण्यात आले आहे.
०यज्ञाच्या वायुशोधक प्रक्रियेमुळे पाणी शुद्ध होते.
वेदांमध्ये सांगितलेल्या शेतीच्या पद्धती
०बी पेरण्याच्या आधी नांगरलेल्या जमिनीवर खाद्याच्या स्वरुपात तुप, दूध आणि मध यांचा प्रयोग करावा यामुळे जमिनीची उत्पन्न क्षमता वाढते.
०बिजे पाण्यात भिजवली जावीत व नंतर ती औषधात टाकण्यात यावीत यामुळे बिजांची गुणवत्ता वाढते.
०धान्याला रात्री गारव्यात व दिवसा उन्हात असे सात दिवस ठेवायला हवे.
०सूर्यावरील डागांवरून पावसाचे अनुमान करता येते.
०कौटिल्याच्या अर्थशास्त्रात वृक्षतोडीबद्धल अत्यंत कडक शिक्षा सांगितल्या आहेत ज्यामुळे पर्यावरण व पर्जन्यमानावर परिणाम होतो.