आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालय प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रत्येक वर्षी जुलै हा राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार आता अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदारांची नोंदणी व्हावी. यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने महिनाभर नवमतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून आता अठरा वर्षे पूर्ण होणा-या महाविद्यालयाती प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जुलै ते ३१ जुलै २०१७ या महिनाभराच्या काळात १८ ते २१ वर्षे वयोगटातील नवयुवक मतदारांची नावनोंदणी करण्याची मोहीम सुरू होत आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदार यादीत नाव नसलेल्या तरुणांकडून नवीन नावनोंदणीसाठी अर्ज क्रमांक भरून घेतील. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ते २२ जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित केली आहे. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयीन युवकांमध्ये मतदार नोंदणीबाबत जागृती निर्माण होण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीचे अायोजन करण्यात येणार आहे. याच मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मयत, दुबार स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी अर्ज नमुना भरून द्यावा. ज्यांच्या मतदार यादीतील नावात काही चुका असल्यास, त्यांनी अर्ज क्रमांक भरून द्यावा. तसेच ज्यांचे मतदार यादीत फोटो नाही. अशा मतदारांनी आपला फोटो मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे अथवा नजीकच्या तहसील कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

महाविद्यालयांत उपक्रम 
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयांतही ही माेहीम राबवली जात अाहे. 

अशी अाहे विशेष मोहीम ... 
बारावीनंतरविद्यापीठात अथवा कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत उच्च तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढले असून कॉलेजच्या प्राचार्यांना या कामासाठी एका प्राध्यापकाची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करावी लागणार आहे. बारावी उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी हे महाविद्यालये, विद्यापीठ तसेच विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात. बारावी उत्तीर्ण झालेल्या जवळपास सर्व मुलांनी १८ वर्षे पूर्ण केलेले असतात. त्यामुळे या सर्वांची नावे मतदार यादीमध्ये नोंदवणे सोयीस्कर व्हावेत, यासाठी विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशाच्या वेळीच प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांकडून मतदार यादीत नाव नोंदणीबाबत हमीपत्र घेण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज भरून घेतानाच मतदार नोंदणीसाठी आवश्यक असणारा अर्ज देण्यात येईल. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले मुले/मुली तत्काळ मतदार बनतील. त्यासाठी त्यांना दुसऱ्या मोहिमेची वाट पहावी लागणार नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...