आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुक्त’च्या ७५ अभ्यासक्रमांच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या १०२ अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी अवघ्या २४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित ७५ हून अधिक अभ्यासक्रमांच्या निकालाची विद्यार्थ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे. परीक्षा होऊन दीड महिना उलटूनही निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

मुक्त विद्यापीठाच्या वतीने विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षा मे २०१६ मध्ये घेण्यात आल्या.
विद्यापीठाच्या वतीने १०२ अभ्यासक्रमांमध्ये तब्बल सहा लाख ८४ हजार विद्यार्थी प्रविष्ट होते. विद्यापीठातर्फे या वर्षापासून परीक्षा पद्धतीत अामूलाग्र बदल केले असून, परीक्षा आयोजन, मूल्यमापन आणि निकालप्रक्रियेमध्ये अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे कमी मनुष्यबळ वापरून परीक्षेचे निकाल अचूक आणि कमीत कमी वेळेत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, परीक्षा उलटून अनेक दिवस झाले असले, तरी अद्याप विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर : प्रथमवर्ष बीए, ऑटोमोबाईल टेक्निक्स, मेकॅनिकल टेक्निक्स, को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन टेक्स्टाइल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन अॅण्ड डोमेस्टिक अप्लायन्सेस, डिप्लोमा इन आर्किटेक्ट अॅण्ड डिझाइन, ब्यूटिपार्लर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, एम.एस्सी. (अॅग्री), मास्टर ऑफ फिलॉसाॅफी, डिप्लोमा इन सिव्हिल सुपरवायझर, फिटर आदी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.

सहा लाख ८४ हजार परीक्षार्थी
विद्यापीठाद्वारेयावर्षी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया आणि परीक्षा आयोजनप्रक्रिया राबविण्यात आली. राज्यातील लाख ८४ हजार ६२६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यातील २४ शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित सर्व अभ्यासक्रमांचे निकाल प्रलंबित आहेत.

आठवडाभरात निकाल जाहीर
बी.ए.बी.कॉम.च्या अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यातील प्रथम द्वितीय वर्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, इतरही शिक्षणक्रमांचे निकाल जाहीर झाले आहे. उर्वरित निकाल पुढील आठवड्यात जाहीर केले जातील. - डॉ. अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक, मुक्त विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...