आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक गुन्हे शाखेतील ‘निवांत’ उद्याेग; न्यायालयीन कोठडीचे आदेश, सेंट्रल जेलमध्ये रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आर्थिक गुन्हे शाखेचा लाचखोर पाेलिस उपनिरीक्षक निवांत जाधव याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी (दि. १८) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देत त्यास न्यायालयाने जामीनही नाकारला. त्याच्या विरोधात आणखी काही तक्रारदारांनी थेट न्यायालयात धाव घेत तक्रार दिल्याने या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे बाहेर पडण्याची शक्यता आहे. 


संशयितास न्यायालयाने जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. रविवारी सुटी असल्याने सोमवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर मंगळवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याने बुधवारपर्यंत त्याला मध्यवर्ती कारागृहात रहावे लागण्याची शक्यता आहे. सरकार पक्षातर्फे कल्पक निंबाळकर, उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी युक्तिवाद केला. 


तक्रारदारांकडून पुरावे सादर
जाधवपकडला गेल्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वी कारवाई झालेल्या काही तक्रारदारांनी थेट न्यायालयात धाव घेत जाधवच्या विरोधात पैशांची मागणी केल्याचे पुरावे सादर केले. एका गुन्ह्यात एका तक्रारदाराकडून तब्बल २० लाख रुपयांची मागणी त्याने केल्याचे पुरावे न्यायालयात देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 


फिर्यादीलाच आरोपी करत ‘निवांत’पणे लुटण्याचा प्रकार
तक्रारदारानेपगारे नामक व्यक्तीकडून फ्लॅट विकत घेतला आहे. मात्र पगारे नामक व्यक्तीने हा फ्लॅट चार ते पाच नागरिकांनी यापूर्वीच विक्री करत फसवणूक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, जाधवने या फिर्यादीलाच दमदाटी करत या गुन्ह्यात आरोपी करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. मुलीच्या वाढदिवसाचा सर्व खर्चही तक्रारदाराला करण्यास सांगितल्याची उर्वरित.पान 


हाफ डेची सुट्टी? 
आर्थिकगुन्हे शाखा सर्वाधिक व्यस्त शाखा आहे. तसेच एखाद्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर एसीबीने कारवाई केल्यानंतर अधिकारी इतर कर्मचारी त्यास भेटणे टाळतात. मात्र, जाधवला भेटण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी न्यायालयात गर्दी केल्याने आर्थिक गुन्हे शाखेला ‘हाफ डे’ दिला की काय? याची न्यायालयात आणि पोलिस आयुक्तालयात चर्चा होती. जाधवसाठी न्यायालयात पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या गर्दीचा नेमका काय ‘अर्थ’बोध असावा, याची आता चर्चा झडत आहे. 

बातम्या आणखी आहेत...