आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sub Inspector Of Police Save Youth, Divya Marathi

पोलिस उपनिरीक्षकाने वाचवले तरुणाचे प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खाकी वर्दीमध्येही माणुसकी असते, याची प्रचिती नुकतीच एका तरुणाला आली. चोपडा लॉन्स येथे लावलेल्या संरक्षक जाळीवरून नदीपात्रात उडी घेण्याच्या प्रयत्नात असणार्‍या एका तरुणाला जिवाची पर्वा न करता सुखरूपपणे खाली उतरवून त्याचे प्राण वाचवण्यात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पवार यांना यश आले.

गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. उपनिरीक्षक आर. डी. पवार आणि दोन कर्मचारी या ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी तैनात होते. याचवेळी काही नागरिक थांबून पुलावरील संरक्षक जाळीकडे पाहून ओरडत होते. पवार हे त्या ठिकाणी पोहोचले असता, एक तरुण जाळीवर चढत असल्याचे त्यांना दिसले. हा तरुण नेमका कशासाठी जाळीवर चढला, याची कल्पना पवार यांना लागलीच आली. त्यांनी विरुद्ध दिशेने चपळाईने जाळीवर चढाईस सुरुवात केली. हे पाहताच त्या तरुणाने अधिक वेगाने जाळी पार करत उडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला. पवार यांनी त्यास तत्काळ पकडले व खाली आणले. तरुणाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व पुन्हा अशी चूक करू नको, असे बजावले. या वेळी तरुणाच्या डोळ्यात पाणी तरळले. नागरिकांच्या मदतीने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.