आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकारांना अाळा घालण्यासाठी थेट काेट्यवधींचा भुयारी मार्गच केला बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नाशिक - शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच वाहनांच्या संख्येतेही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर विशेषत: आडगाव, द्वारका, मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी हाेऊन छोट्या -मोठ्या अपघातांत वाढ झाली होती. सातत्याने हाेणाऱ्या वाहतूक कोेंडीमुळे या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्यांनाही तारेवरची कसरतच करावी लागत जावे लागत हाेती. द्वारका परिसरातून शिर्डी, सिन्नर, मुंबई, मालेगाव, चांदवड आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरात नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीत अनेकदा पादचाऱ्यांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग साकारण्यात आला. यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये खर्चही करण्यात अाला. त्याचे २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले. 
 
शहरासाठी भूषणावह ठरणाऱ्या या प्रशस्त पाच द्वार असलेल्या भुयारी मार्गामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता जपली जाईल अाणि महामार्गावरून रस्ता अाेलांडताना हाेणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा नाशिककरांना हाेती. मात्र, अल्पावधीतच शहरवासियांची ही अपेक्षा फाेल ठरली. प्रशासनाकडून या भुयारी मार्गाच्या नियमित देखभाल-दुरुस्तीकडे तसेच सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात अाले अन‌् काही वर्षातच त्याला अवकळा अाली. ना महापालिका प्रशासन, ना राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने या गाेष्टीकडे लक्ष दिले. परिणामी, येथे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरलेली, तसेच ड्रेनेजची लाईन तुटून प्रचंड दुर्गंधी पसरलेली, अनेक विद्युत दिवेही बंद स्थितीत असल्याचे दिसून अाले. रात्रीच्या सुमारास या ठिकाणी प्रकाशाअभावी असुरक्षितता जारवते. दुरवस्था तसेच असुरक्षिततेमुळे पादचाऱ्यांनी या भुयारी मार्गांकडे पाठ फिरवली अन‌् टवाळखाेर, गैरप्रकार करणाऱ्यांनी या मार्गाचा ताबा घेतला. परिणामी, पाेलिस प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. याबाबत नागरिकांच्या तक्रारी अलिकडे वाढू लागल्या हाेत्या, म्हणून पाेलिसांनी हा मार्गच बंन करून टाकण्याचा अजब पर्याय अवलंबला. 

पाेलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक नागरिकांना अाता परत धाेकादायक पद्धतीने रस्ता अाेलांडावा लागत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. अशा स्थितीत अपघात झाल्यास जबाबदार काेण, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 

केवळ गुन्हेगारी घटना घडू शकतात म्हणून घेतला निर्णय! 
द्वारका,जुने नाशिक, काठेगल्ली या परिसरातील पादचाऱ्यांसह येथून जाणाऱ्या प्रवाशांना भुयारी मार्गाचा मोठा आधार होता. महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडून या भुयारी मार्गाची देखभाल केली जात नाही ही वेगळीच बाब आहे. मात्र, केवळ या ठिकाणी गुन्हेगारी घटना घडू शकतात. या कारणाने बॅरिकेड‌्स लाऊन भुयारी मार्गाचा वापरच बंद कण्याचा पोलिस प्रशासनाने निर्णय घेतला. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त हाेत अाहे. विशेष म्हणजे, या भुयारी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीबाबतची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाची असताना दुसरीकडे या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करणे तर दूरच साधी कल्पनाही या विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे ही समस्या जैसे थेच अाहे. 

संबंधित विभागांनी बैठकीतून समन्वय साधण्याची गरज 
स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. उड्डाणपुलाच्या निर्मितीच्या चार वर्षांनंतरही महामार्ग विशेषत: द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जेसै थेच आहे. रोजच होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे छोट्या-मोठ्या अपघातांतही वाढ हाेत आहे. भूयारी मार्गाचा पादचाऱ्यांकडून याेग्य वापर झाला तर या ठिकाणची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण, महापालिका पोलिस प्रशासनाने बैठक घेऊन भूयारी मार्गाबाबत प्रभावी उपायायोजना सुचविल्यास पादचाऱ्यांकडून या भूयारी मार्गाचा वापर वाढू शकतो. याबाबत संबंधित विभागांकडून नागरिकांमध्ये प्रबोधनही केले गेले पाहीजे. 

याबाबत कुठलीही कल्पना मला नाही... 
^द्वारकायेथीलभुयारी मार्ग बॅरिकेड‌्स लावून बंद केल्याबाबत मला काहीच कल्पना नाही. अशाप्रकारे भूयारी मार्ग कसा काय बंद करू शकतात हाच प्रश्न आहे. याबाबत मला माहिती घ्यावी लागेल. भुयारी मार्गाची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे आहे, हे खरे अाहे. -प्रशांत खोडस्कर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

भुयारी मार्ग बंद; पण समस्या तर अाजही कायम 
द्वारका येथील भुयारी मार्ग पाेलिसांनी गैरप्रकार वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड‌्स लावून बंद केला खरा. मात्र, यामुळे मूळ समस्या सुटली असे नाहीच. याबाबत ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता काही व्यक्तींचा वावर दिसून अाला. मुख्य म्हणजे द्वारावर बॅरिकेड‌्स लावले असताना ते सरकावूनदेखील टवाळखाेर प्रवेश करू शकतात, याचा विचार बहुदा पाेलिस प्रशासनाने केला नसावा. केवळ घाईत निर्णय घेण्यापेक्षा नागरी हिताचा सर्व बाजूने विचार करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त हाेत अाहे. प्रत्यक्षात मात्र तसे हाेताना दिसून अालेले नाही. विशेष म्हणजे, याबाबत पालिकेसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणही अंधारातच असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात अाले. यामुळे भुयारी मार्गातील समस्या अन‌् सुरक्षिततेचा प्रश्न अाजही कायम अाहे. 

लाेकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष 
याभुयारी मार्गाच्या दुरवस्थेबाबत माेठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यंानी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला हाेता. यावेळी नागरिकांच्या सुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय करण्याबाबत सूचना केल्या होत्या. याच प्रश्नांसाठी आमदार देवयांनी फरांदे यांनीही दौरा करत या भुयारी मार्गाच्या देखभालीबाबत अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला होता. यावेळी भुयारी मार्ग पादचारी वापरत नसतील तर पुण्याच्या धर्तीवर या ठिकाणाहून दुचाकी वाहनांची वाहतूक होऊ शकते का, याबाबतची चर्चादेखील करण्यात आली होती. मात्र, ‘रात गई बात गई’ याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी सर्वांना भुयारी मार्गाचा प्रश्न साेडविण्याचा विसरच पडला. 
 
अाणि पोलिस सांगतात... 
शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांनी डोके वर काढले आहे. खुलेआम तोडफोड, खून असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कोम्बिंग ऑपरेशन, नाकांबदी असे उपाय सुरू असताना दुसरीकडे केवळ गैरप्रकार घडू नयेत वा गुन्हेगारांना अाश्रय मिळऊ नये, या कारणाने द्वारका परिसरातील भुयारी मार्ग पोलिस प्रशासनाकडून बॅरिकेड‌्स लावून बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाला मात्र अंधारात ठेवल्याचे सांगण्यात येते. ‘चोर सोडून संन्यालाला फाशी’ अशा पाेलिसांच्या वर्तणुकीमुळे कोट्यवधींचा हा मार्ग अाता बंदअवस्थेत अाहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मार्गात टवाळखाेरांची घुसखाेरी अद्यापही सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाल्याने ठाेस उपाय करणे साेडून थेट मार्गच बंद करण्याचा पर्याय कितपत याेग्य अाहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे. 
गुन्हेगारी घटनांच्या तक्रारी, महामार्ग प्राधिकरणाला दिले पत्र 
भुयारी मार्ग बंद केल्याबाबत अाम्हाला कल्पनाच नाही 
तक्रारी आल्याने घेतला निर्णय 
लक्ष्मीकांत पाटील, पोलिसउपायुक्त 
{द्वारका परिसरातील भुयारी मार्ग थेट बंद का करण्यात आला आहे? 
-रात्रीच्या वेळी या भुयारी मार्ग परिसरात गैरप्रकार वाढले हाेते. त्यामुळे ताे पादचाऱ्यांसाठी असुरक्षित बनला होता. याबाबत तक्रारी आल्याने भुयारी मार्ग बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला. 
{भुयारी मार्ग बंद करण्याबाबत महामार्ग प्राधिकरणाला माहिती देण्यात आली होती का? 
-भुयारी मार्गाचा वापर होत नसल्याने हा मार्ग बंद करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देण्यात आले आहे. 
अाणि पोलिस सांगतात... 
बातम्या आणखी आहेत...