आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Businessman Who Export Capacitor To World

मेक इन इंडिया : अमेरिकेने नाकारल्यानंतर जिद्दीने बनवले कॅपेसिटर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने पाेखरण अणुचाचणी करण्याचा क्रांतिकारी निर्णय प्रत्यक्ष अमलात अाणला. त्यामुळे अांतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व वाढले, तशी अमेरिकेसह अनेक देशांनी अापली धास्तीही घेतली. याच कारणावरून अमेरिकेने भारताला अणुचाचणीसाठीचे कॅपेसिटर्स यापुढे न पुरवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच वेळी नाशिक जिल्ह्यातील एका मराठमाेळ्या उद्याेजकाने हे कॅपेसिटर्स स्वत:च्या कारखान्यात उत्पादित करण्याची मनाशी खूणगाठ बांधली व ती प्रत्यक्षातही अाणली. मारुती कुलकर्णी असे या उद्याेजकाचे नाव असून त्यांच्या कारखान्यात तयार हाेणारी वेगवेगळी कॅपेसिटर्स अाता ४९ देशांत निर्यात हाेतात.

वडील अायटीअायला शिक्षक अाणि अाई गृहिणी अशा अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मारुती कुलकर्णी यांनी िडप्लाेमापर्यंत शिक्षण पूर्ण केले अाणि नाेकरी सांभाळली. मात्र ते काम करत असलेली शक्ती कॅपेसिटर्स कंपनी बंद पडल्यानंतर मात्र पुन्हा नाेकरीच्या फंदात न पडता प्रवीण मिरजकर यांच्यासाेबत भागीदारीत सिन्नरजवळ ‘रेक्टिफेज कॅपेसिटर्स’ ही कंंपनी उभारली. नेमक्या त्याच वेळी पाेखरण येथे भारताने अणुचाचणी केली हाेती. या एेतिहासिक घटनेनंतर भारताचे अांतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढले, तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांकडून भारतावर प्रचंड दबावही वाढला. इतकेच नव्हे तर अणुचाचणीच्या काही प्रक्रियांकरिता अावश्यक असलेले एनर्जी स्टाेअरेज कॅपेसिटर्स भारताला देण्यावरही अमेरिकेने बंद घातली. या घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर अापला देश जर अणुचाचणी करू शकताे, तर मग अापण अशी कॅपेसिटर्स अापल्याच देशात का उत्पादित करू शकत नाहीत, असा प्रश्न कुलकर्णी यांना पडला, अाणि या कामासाठी त्यांनी स्वत:ला झाेकून दिले व जिद्दीने त्यात यशस्वीही झाले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळील माळेगाव एमअायडीसीत कुलकर्णी यांचा कारखाना अाहे. या ठिकाणी त्यांनी अशा कॅपेसिटर्सचे उत्पादन सुरू केले. अाज राॅकेट लाँचर्स, पाणबुडी, अणुभट्ट्यांच्या काही महत्त्वाच्या तपासणीकरिता अावश्यक असलेली ही कॅपेसिटर्स ते देशातील ‘डीअारडीअाे’सारख्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना ते पुरवठा करीत अाहेत. इतकेच नव्हे तर कुलकर्णी यांच्या कंपनीत तयार हाेणा-या वाॅटर कूल्ड कॅपेसिटर्सची तुर्की, रशिया, जर्मनी, इटली, अर्जेंटिना, ब्रिटन, ब्राझील यांसारख्या ४९ देशांत निर्यातही हाेते.
प्रत्येक कर्मचा-याकडे घर अन‌् कारही
कुलकर्णी यांच्या उद्याेगात काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा कर्मचारी म्हणून नव्हे तर मालक म्हणून सगळ्या प्रकारची कामे करताे. त्यामुळे सुपरवायझर, सीनियर, ज्युनियर असा भेद िनर्माण करणारी पदेही अामच्याकडे नाहीत. विशेष म्हणजे कंपनीत दहा वर्षे पूर्ण करणा-या सगळ्या कर्मचा-यांकडे कर्ज नसलेली स्वत:ची घरे व चारचाकी वाहन अाहे, असे कुलकर्णी अभिमानाने सांगतात. त्यांचे भागीदार प्रवीण मिरजकर हे मार्केटिंगचे काम सांभाळतात.
विदेशी चलन वाचवताे
देशात संरक्षण उत्पादनांकरिता वापरली जाणारी कॅपेसिटर्स भारताला अायात करावी लागत हाेती. त्याकरिता माेठ्या प्रमाणावर विदेशी चलन खर्च करावे लागत हाेते. मात्र अाता भारतातच ही कॅपेसिटर्स तयार हाेत असल्याने विदेशी चलन अल्प प्रमाणात खर्च हाेते. तर कुलकर्णींच्या कारखान्यातील वाॅटर कूल्ड कॅपेसिटर्सची ४८ देशांत िनर्यात हाेत असल्याने या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर विदेशी चलन देशाला मिळते.