आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर-नाशिक ग्रीन काॅरिडाॅरमधून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसिसद्वारे उपचार घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीला एका मेंदूमृत व्यक्तीच्या अवयवदानामुळे जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे, महिनाभरात दुसरा ग्रीन कॅरिडाॅर सिन्नर ते नाशिकपर्यंतच्या मार्गावर अनुभवास अाला असून, पुण्याहून साडेतीन तासात रुग्णवाहिका ही पाेहोचली.
पुण्यातील एक निवृत्त वरिष्ठ अधिकारी मेंदूमृत झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया नाशकात पार पडली. त्या महिलेला पाच वर्षांनंतर या दुर्धर आजारातून मुक्ती मिळाली.

पुण्याच्या झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डीनेशन सेंटरच्या माध्यमातून प्रतीक्षा यादीत प्रथम क्रमांक असल्याने नाशिकच्या या महिलेची निवड करण्यात येऊन मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

महिनाभरा पूर्वीच नाशिकच्या सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये एका मेंदूमृत झालेल्या सिन्नरच्या महिलेच्या चार अवयवांचे दान करण्यात अाले. त्यावेळी पहिल्यांदा नाशिक-पुणे मार्गावर पाेलिसांच्या सहकार्याने ग्रीन कॅरिडाॅर उभारण्यात अाला हाेता. त्यानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये अशाच प्रकारे पुण्याहून मूत्रपिंड अाणून तिचे प्रत्याराेपण करण्यात अाले. यावरून अवयवदानाबाबत माेठी जागृती होत असल्याचे दिसून येत आहे.

ऋषिकेश हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. भाऊसाहेब माेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील वडनेर-खाकुर्डी पाेालिस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्याच्या पत्नीचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. पाच वर्षांपासून त्या महिलेवर डायलिसिद्वारे उपचार सुरू होते. कमी वयातच दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने जगण्याशी संघर्ष होता. नात्यागाेत्यातही मूत्रपिंड जुळत नसल्याने शाेध सुरू हाेता. त्यातच पोलिस दलातीलच एका वरिष्ठ अधिकारी मेंदूमृत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व निभावत त्यांचे यकृत, डोळे दोन्ही मूत्रपिंड हे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

पुण्याच्या झोनल सेंटरमधून याबाबतची माहिती समजताच मूत्रपिंडाची गरज असलेल्या नाशिकच्या महिलेचा रक्तगट मेंदूमृत व्यक्तीचा रक्तगट जुळल्याने एक मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला. मंगळवारी (दि. ७) रात्रीच नाशिकहून डाॅक्टरांचे पथक रुग्णवाहिका घेऊन पुण्याकडे निघाले. सर्व प्रक्रिया पार पडून बुधवारी (दि. ८) सकाळी वाजता पुण्याहून निघाले असता १० .३० वाजता रुग्णालयात दाखल झाले. यासाठी ग्रामीण पाेलिसांसह नाशिक पाेलिसांनी खास यंत्रणा उभारून नेहमीच वाहतूक काेंडीने त्रस्त असणाऱ्या नाशिक-सिन्नर मार्ग अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करण्यात अाला. यानंतर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. संजय रकिबे, अनिरुद्ध ठाेकर, अनिरुद्ध चिमाेठे, शाम पगार यांच्या प्रयत्नातून यशस्वी झाली.

^नाशकातच नव्हे,तर देशभरात अनेक रुग्णांना मूत्रपिंड, यकृताची अावश्यकता अाहे. मेंदूमृत शरीराच्या अवयवदान चळवळीला चालना मिळाली पाहिजे. पुण्यातील या पाेलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने अवघ्या ३७ वर्षीय महिलेला खऱ्या अर्थाने जीवदान मिळाले अाहे. या गरजू रुग्णांना आयुष्य मिळावे, यासाठी अवयवदानाची प्रक्रिया समजावून त्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. - डाॅ. भाऊसाहेब माेरे, संचालक,ऋषिकेश हॉस्पिटल
बातम्या आणखी आहेत...