आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय न मिळाल्यास घेणार समाधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- स्थानिकनेते अाणि जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांकडून साधू-महंतांना देण्यात येत असलेला त्रास प्रशासनाने राेखल्यास गुरुपाैर्णिमेला समाधी घेण्याचा इशारा महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांनी दिला अाहे.
येथील पाेलिस ठाण्यासमाेरील नीलपर्वत जुन्या अाखाड्याच्या पायथ्याशी दक्षिणमुखी हनुमान मंदिर अाहे. या मंदिरातील साधूंना १९३० मध्ये ग्रामस्थांनी दीड एकर जागा दान दिली हाेती. या मंदिरालगत गत कुंभमेळ्यात शासनाने पत्र्याचे शेड उभारून साधूंची व्यवस्था केली हाेती. दरम्यान, या जागेजवळ राजस्थानमधील नाथद्वारा भागातून ४० संन्याशी यज्ञ अनुष्ठानासाठी अाले अाहेत. पाली (राजस्थान) येथील हरिअाेम अाश्रमाचे स्वामी प्रणवानंद तीर्थ यांनी यज्ञासाठी सर्व तयारी केली असताना काही स्थानिक नेते, जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांनी या साेहळ्यात हस्तक्षेप करण्यास प्रारंभ केला. पत्र्यांचे शेड ताेडणे, कारागिरांना मारहाण करणे, धमकावणे असे प्रकार सुरू झाल्याने संन्याशांची काेंडी झाली अाहे. दाेन महिन्यांचा चतुर्मास प्रथमच त्र्यंबकनगरीत करण्याचा मनाेदय या प्रकारामुळे अनिश्चितेत सापडला. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अाराेप महंत कल्पवृक्षगिरी यांनी केला अाहे. या प्रश्नी प्रशासनाने न्याय दिल्यास गुरुपाैर्णिमेला समाधी घेण्याचा इशाराच त्यांनी दिला अाहेे. त्यांचे शिष्य महंत रामगिरी यांनी काही भूमाफिया साधू-संन्याशांना त्रास देऊन लूट करीत असल्याचा अाराेप केला अाह