आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना अचानक भेट देऊन तपासणार दप्तराचे ओझे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्केच दप्तराचे वजन असावे. त्यापेक्षा जास्त वजन असेल, तर मुलांना पाठदुखी, मान दुखणे, मणक्याचे आजार, थकवा येेणे, मानसिक ताण, डोकेदुखी यांसारखे आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार कमी करण्यासाठी शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात. शिक्षण विभागातर्फे येत्या पंधरा दिवसांत शाळांना अचानक भेटी देऊन दप्तराचे ओझे तपासले जाणार आहे, दप्तराचे ओझे जास्त असल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी नवनाथ अौताडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्के वजनच दप्तराचे असावे. त्यापेक्षा जास्त वजन असेल, तर मुलांमध्ये वेगवेगळे आजार जडण्याची शक्यता असते. शिक्षकांनी दप्तराची तपासणी करून अनावश्यक दप्तरास शाळेत आणण्यास मनाई करणे अावश्यक आहे. पालकांनीही मुलांच्या दप्तर वेळापत्रकानुसार आहे की नाही, हे तपासले पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शाळांनी शासन निर्णयानुसार दप्तर आहे की नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या अाहेत. येत्या १५ दिवसांत शाळांना अचानक भेटी देऊन दप्तराची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आैताडे यांनी दिली.

असे करा दप्तर हलके
एक बेंच, एक पुस्तक, तीन पुस्तके, तीन वह्या, कमी पानांच्या वह्या, जुने पुस्तकांची उपलब्धता, पुस्तकांसाठी कपाट, स्वाध्याय पुस्तिका प्रयोगवह्या एकच दिवस आणणे, शुद्ध पाण्याची व्यवस्था याबरोबरच विद्यार्थी पालकांचे समुपदेशन करून दप्तराचे ओझे हलके केले जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...