आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधाकर बडगुजर यांच्यावर हल्ला, खंडणीची मागणी करीत मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - नगरसेवकतथा माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. खंडणी दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत टिप्पर गँगशी संबंधित सराईत गुन्हेगारांनी दहशत पसरविल्याचे समजते. सावतानगर येथील बडगुजर यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली.

बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास बडगुजर त्यांच्या कार्यालयासमोर उभे असताना गणेश कावळे त्याचा एक साथीदार त्यांच्याकडे आला ‘सिडकोत तुम्हाला राजकारण करायचे असेल तर आम्हाला एक लाख रुपये द्या,' अशी मागणी त्यांनी केली. बडगुजर यांनी त्यास नकार देताच कावळे त्याच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या अन्य दोन साथीदारांनी कोयते धारदार शस्र आणून बडगुजर यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. बडगुजर यांनी तेथून पळ काढल्याने ते सुदैवाने बचावले. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली.

या प्रकरणी संशयित गणेश ऊर्फ गण्या कावळे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर करीत आहेत. घटनेची माहिती कळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुभाष गायधनी, अजय भवरे, देवानंद बिरारी, सुनील पाटील, देवा वाघमारे, सतीश खैरनार तसेच नगरसेवक प्रकाश लोंढे, नगरसेविका शोभा निकम यांनी पोलिस ठाण्यात येऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की.: याघटनेच्या वेळी बडगुजर यांच्या कार्यालाबाहेरून जाणारे बीट मार्शल एम. एल. गायकवाड यांनी या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एकाने थेट गायकवाड यांच्यावर कोयता उगारला धक्का देऊन पुढे गेला. त्यामुळे गुंडांना पोलिसांचीही भीती राहिली नसल्याचे बाेलले जात अाहे. यापूर्वीही टिप्पर गँगच्या गुंडांनी पोलिसांना मारहाण केली आहे.
संशयितटिप्पर गँगशी संबंधित : याघटनेतील संशयित गणेश कावळे हा टिप्पर गँगशी संबंधित असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच हा जेलमधून सुटून आल्यावर पुन्हा दहशत पसरवित होता. त्यामुळे टिप्पर गँगने पुन्हा तोंड काढले असून, त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली घटना कैद
हीघटना बडगुजर यांनी कार्यालयात कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. पोलिस या फुटेजची तपासणी करीत आहेत.