आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय होणार ‘बिग हायटेक’, पाहणी दरम्यान महापालिका आयुक्तांनी केल्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- द्वारकायेथील सर्व्हिसरोडवर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मात्र, तसा अनुभव महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना शनिवारी (दि. १७) डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यानंतर आला. या रुग्णालयासमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अरुंद झालेल्या रस्त्यावरून आयुक्तांच्या गाडीला वाट शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
तिगरानिया कॉर्नर ते द्वारका चौफुलीवर अवजड वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च राहत असल्यामुळे कारवाई फक्त देखावाच ठरते. अशीच स्थिती कायम असल्याने शनिवारी महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम हे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाची पाहणी करून निघाले असता त्यांची गाडी रुग्णालयासमोरील वाहनांच्या कोंडीत सापडली. या वाहनांच्या कोंडीतून मार्गक्रमण करण्यासाठी त्यांच्या चालकाला मोठी कसरत तर करावी लागली. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव खुद्द आयुक्तांनाचा आल्याने येथील समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तीन महिन्यांतच सुविधा
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी दिलेला प्रस्ताव मंजूर झालेला अाहे. येथील पाहणीदरम्यान आयुक्तांनी तीन महिन्यांत चांगली सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. डॉ.राजेंद्र भंडारी, मुख्यवैद्यकीय अधिकारी
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासमोर वाहनांच्या गराड्यात अडकलेली आयुक्तांची गाडी.