आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suhas Kande, Tambade Elected As Shiv Sena District President

सुहास कांदे, तांबडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष अाणि नांदगाव येथून विधानसभेची निवडणूक लढलेले सुहास कांदे यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी (ग्रामीण) निवड झाली आहे. त्यांच्याकडे येवला, नांदगाव, मालेगाव या मतदारसंघांची जबाबदारी असेल.त्यांच्याबराेबरच बागलाण, कळवण आणि निफाड या तालुक्यांसाठी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी ही भाऊलाल तांबडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया शिवसेनेत दाखल झालेल्या कांदे यांच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून वादंग झाल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली हाेती. आता त्यांची जयंत दिंडे यांच्या रिक्त जागेवर जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारभारी आहेर यांच्या रिक्त जागेवर भाऊलाल तांबडे यांना संधी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबईत उद्धव ठाकरे यांनी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, दिंडोरी प्रमुख सुहास सामंत यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते.
छायाचित्र: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमवेत सुहास कांदे भाऊलाल तांबडे.