आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या युवतीने केली काकांच्या घरी आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दीड महिन्यापूर्वी नाशिकहून काकांकडे राहण्यासाठी आलेल्या युवतीने घरामागील पत्र्याला दोर बांधून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री न्यू म्हाडानगर, एन-९ येथे घडली. चित्रा सोपान सोनवणे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
चित्रा ही मूळची नाशिक येथील. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती औरंगाबादेत एकनाथ त्र्यंबक सोनवणे या काकांकडे आली होती. रात्री उशिरा ती उठली आणि घराच्या मागील बाजूस भांडी धुण्यासाठी बांधलेल्या शेडच्या लोखंडी अँगलला दोर बांधून आपली जीवनयात्रा संपवली. तिने असे का केले याचे कारण काकांना माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सकाळी काका आणि घरातील अन्य सदस्यांनी चित्राचा शोध घेतला असता ती फासावर लटकलेली आढळून आली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिस उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत चित्राचा मृतदेह खाली उतरवला आणि सकाळी वाजता घाटीत नेला. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सायंकाळी चित्राचा मृतदेह घेऊन सोनवणे नाशिककडे रवाना झाले.
बातम्या आणखी आहेत...