आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोर्ट मार्शल होण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी’, मृत लष्करी जवानाच्या डायरीत सापडली नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोर्ट मार्शल होण्याच्या भीतीने  डी.एस. रॉय मॅथ्यूज या जवानाने आत्महत्या केल्याचा उलगडा देवळाली कॅम्प पोलिसांनी केला आहे. ‘कोर्ट मार्शल होण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, मॅडम मला क्षमा करा, सर मला क्षमा करा’ असा मजकूर मॅथ्यूजच्या डायरीत लिहिलेला आढळल्याने हा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 
 
शवविच्छेदन अहवालातही गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नातेवाइकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात न घेतल्याने तणाव वाढला. पोलिसांनी जवानाच्या नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषेची अडचण येत असल्याने तोडगा निघाला नाही. गुरुवारी तोफखाना विभागाचा जवान डी. एस. रॉय मॅथ्यूजने (३५) हेगलाइन परिसरातील बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांपासून हा जवान बेपत्ता होता. त्याचा कुजलेला मृतदेह सापडला.

अफवांमुळे यंत्रणा पेचात   
लष्करी जवानाच्या आत्महत्येबाबत अफवा पसरत असल्याने पोलिस पेचात पडले. ‘जवानास लष्करी अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून घरकाम करण्यासाठी दबाव, कथित  प्रेमसंबंधाची चर्चा, घरकामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याचा तणाव तसेच कोर्ट मार्शलची भीती होती, अशा अनेक अफवा सध्या पसरल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...