आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिमान डाॅलीची अात्महत्या, मित्र-मैत्रिणींना बसला धक्का; तरुणांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या महिन्यात कौशल बाग या हुशार विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी ताजी असतानाच, डॉली गायकवाड या आणखी एका विशीतील तरुणीने गुरुवारी (दि. ६) रात्री गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला. रोज मित्र-मैत्रिणींमध्ये ऊठबस असणाऱ्या, कामामध्ये रमणाऱ्या बुद्धिमान डॉलीने आत्महत्या केल्याच्या बातमीने तिच्या मित्र-मैत्रिणींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्यासाठी हा खूप मोठा, अनपेक्षित धक्का होता.

बुधवारी सगळ्यांसोबत वावरणारी डाॅली दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्यात नाही, हे दाहक सत्य पचवण्याची ताकदच त्यांच्यात उरली नाही. त्यांच्याचपैकी काहींनी तिचा लोंबकळणारा मृतदेह खाली काढले. भरलेले घर, लग्न झालेली मोठी बहीण, लहान भाऊ अन् घरात सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध अशा वातावरणात वाढलेल्या डाॅलीला घरच्यांची उत्तम शिकवण हाेती. ढोलपथकाची शिस्त पाळणारी डाॅली नैराश्याची शिकार झाली, यावर विश्वास बसणारा प्रत्येक जण तिच्या घराच्या दिशेने वळत होता. तिडके कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या डॉलीने आत्महत्या केल्याची बाब गुरुवारी रात्री तिची मैत्रीण भावाच्या लक्षात आली. पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे.
 
अाधी काैशल... अाता डाॅली
असाच काहीसे कौशल बागच्या बाबतीत घडले हाेते. आपले सॉफ्टवेअर आणि त्याबद्दलची सर्व माहिती डिलीट करून आत्महत्या करणारा मुलगा कामामुळे इतक्या नैराश्यात जावा, नियमांची पक्की असणाऱ्या डाॅलीने वैफल्याने जीवनाचा शेवट करावा, असे प्रश्न अाता पडले अाहेत. समाजशास्त्रज्ञांच्या मते नाशिकच नाही, तर देशभरात नैराश्यामुळे तरुण मृत्यूला जवळ करीत आहेत. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी प्रामुख्याने संवाद असावा, असे समुपदेशकांचे सांगणे आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळायला हवे. काम आणि वाढत्या स्पर्धेमुळे येणारे नैराश्य अनेक हुशार तरुणांचा जीव घेते आहे. एकप्रकारे हे राष्ट्रीय बाैद्धिक संपत्तीेचे नुकसानच म्हणावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...