आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावी जनजागृतीच्या अभावामुळे सुकन्या योजनेला लागले ग्रहण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुलींबाबतसमाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, मोठे झाल्यानंतर त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने जानेवारी २०१४ पासून राज्यभरात सुकन्या योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अजूनही बहुसंख्य मुलींच्या नावाने सुकन्या योजनेचे पैसे टाकण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना देण्यात येतो.
मुलींचा जन्मदर वाढविणे, नवजात बालिकांची होणारी हत्या थांबविणे, बालविवाह नियंत्रणात ठेवणे, मुलींना शिक्षण आरोग्याची सुविधा मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जानेवारीपासून सुकन्या योजना सुरू केली आहे. सदर योजना महिला बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जन्मताच मुलीच्या नावे राज्य शासनाकडून २१ हजार २०० रुपये आयुर्विमा महामंडळाकडे जमा करण्यात येतात. वयाच्या १८ व्या वर्षी सदर मुलीच्या नावाने एक लाख रुपये जमा होत असून, सदर पैसे वयाच्या १८ वर्षांनंतरच काढता येतात. यासाठी वयाच्या १८ वर्षांपूर्वी लग्न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या योजनेसाठी केवळ दोन अपत्यांवर कुटुंब नियोजन करण्याचे अट टाकण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी किंवा ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकेकडे किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आईवडिलांचा रहिवासी दाखला, जन्मनोंदणी प्रमाणपत्र,दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला, दुसरे अपत्य असल्यास कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. वयाच्या १८ व्या वर्षीरक्कम मिळणार असल्याने ही रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र, या योजनेबाबत प्रशासनाने नागरिकांत फारशी जनजागृती केली नाही. त्यामुळे ही योजनाच अनेकांना माहिती नसल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक अर्ज करीत नसल्याची माहिती समोर आली आहे.
जनजागृतीकडे दुर्लक्ष
शहरातदारिद्र्यरेषेखालील हजारो कुटुंबे आहेत. यातील मुलींना या योजनेचा लाभ झाला असता. मात्र, शासनाने प्रशासनानेही योजनेच्या जनजागृतीबाबत फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे आजपर्यंत अनेक मुलींचा या योजनेत समावेश झाला नाही. योजनेचा लाभ देण्यासाठी अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी विशेष जनजागृती करावी, असे आदेश शासनाने द्यावे, जेणेकरून पालकवर्ग स्वत: अर्ज करतील. जनजागृतीसाठी शासनाने स्वत: मोहीम सुरू करावी. अर्ज भरून घेण्याविषयी टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.
योजनेची माहितीच नाही...
माझ्याकडेदारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र, शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सुकन्या योजनेबाबत अाम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. नितीनमोहोड, नागरिक