आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकन्या’याेजनेला मिळणार ‘भाग्यश्री’ची जाेड, पालकांनाही मिळणार अार्थिक लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यातील अाघाडी शासनाने स्त्रीभ्रूण हत्या राेखण्याच्या उद्देशाने माेठी वाजतगाजत अाणलेली ‘सुकन्या’ याेजना अद्यापही सुव्यवस्थितपणे कार्यरत झालेली नाही. त्यामुळे ‘सुकन्या’ याेजनेचे पुनर्गठन करण्यात येणार अाहे. तसेच त्या याेजनेला ‘भाग्यश्री’ किंवा तत्सम नावाच्या याेजनेशी ‘क्लब’ करण्याबाबतचा प्रस्ताव महिला-बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्रालयाच्या संमतीसाठी पाठविण्यात अाला अाहे.
महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी त्याबाबतचे सूताेवाच नाशिकमध्ये अाल्या असताना ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केले. या प्रस्तावित याेजनेमुळे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या पंतप्रधानांच्या घाेषणेला बळ मिळू शकणार अाहे. सत्तेत यायच्या अाधी मी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‘माझी कन्या भाग्यश्री’ नावाने याेजना राबवत हाेते. त्याच याेजनेत अजून काही चांगले बदल करावेत असा प्रस्ताव पाठविण्यात अाला अाहे. त्या याेजना एकमेकींना पूरक करून किंवा क्लब करून सुरू हाेऊ शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

मुलीला६०० रुपये शिष्यवृत्ती : त्याचप्रमाणे‘आम आदमी विमा योजने’त समाविष्ट असलेल्या ‘शिक्षा सहयोग योजने’त त्या मुलीला ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती प्रति महिने, इयत्ता वी ते १२ वीमध्ये ही मुलगी शिकत असताना दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही बालिका १८ वर्षांपर्यंत अविवाहित, त्याचप्रमाणे १० वी उत्तीर्ण आणि वडील महाराष्ट्राचे रहिवासी आवश्यक आहे.

पालकांनाही लाभ :
त्याशिवायया मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाईल. पालकाचा मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे रक्कम देण्यात येईल. नैसर्गिक मृत्यूस ३० हजार रुपये, अपघातामुळे मृत्यू-अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपये, दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ७५ हजार रुपये आणि एक डोळा किंवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये देण्याचाही त्यात समावेश अाहे.
अशी अाहे ‘सुकन्या’
राज्यातीलस्त्री भ्रूणहत्या रोखणे, मुलींचे शिक्षण आरोग्य सुधारणे, बालविवाह रोखणे, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे या व्यापक दृष्टिकोनातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी अाघाडी सरकारने ‘सुकन्या’ योजना जानेवारी २०१४ पासून अंमलात अाणण्यास प्रारंभ केला. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे (दोन अपत्यांपर्यंत) २१ हजार २०० रुपये मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये इतकी रक्कम देण्याच्या निर्णयाचा अंतर्भाव अाहे.

अशी असेल ‘भाग्यश्री’
यायाेजनेअंतर्गत ज्यांच्या घरात मुलीचा जन्म हाेईल, त्यांनी त्याची नाेंद केल्यावर संबंधित मुलीच्या नावाने विशिष्ट रक्कम मुदतठेव म्हणून ठेवली जाईल. दाेन मुली झाल्यास दाेघींसाठी ही याेजना लागू राहील. प्रारंभीच्या टप्प्यात मुलींचा जननदर कमी असलेल्या महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार अाहे.