आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सुला फेस्ट'दरम्यान हाेणार २० काेटींवर उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय वाइनचं नाव पोहोचवणारा "सुला फेस्ट' फेब्रुवारी महिन्याच्या आणि तारखेला होणार आहे. या फेस्टसाठी केवळ राज्य-परराज्यच नव्हे, तर परदेशातूनही वाइनप्रेमींची आवर्जून उपस्थिती असते. त्यामुळे या काळात शहरातलं हॉटेलिंगही बहरतं, तर टूर अाणि ट्रॅव्हल्स कंपन्यांचा व्यवसायही तेजीत असताे. शहरात साडेतीन हजारांदरम्यान हाॅटेल्सच्या रूम्स असून, "सुला फेस्ट'दरम्यान सहजासहजी रूम िमळणे मुश्कील हाेतं. फेब्रुवारीसाठी हॉटेल्सच्या रूमचे दर हे नेहमीपेक्षा चारपटीने वाढले असून, फेस्टमुळेच याविविध व्यवसायांतून िकमान २० काेटींची उलाढाल हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे.
वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य केंद्र शासन मदत करत आहे. भारतीय वाइन जगाच्या नकाशावर नेण्यात सुला विनियार्डचा मोठा हातभार आहे. दरवर्षी "सुला फेस्ट'च्या माध्यमातून भारतीय वाइनबद्दल माहिती देऊन जनजागृती केली जातेय. फेब्रुवारीच्या या फेस्टमुळे शहरातील लहानांपासून ते थ्री स्टार हॉटेल्सचे जवळपास सर्वच रूम्स बुक झाले असून, दरांतही किमान दुप्पट वाढ झाली आहे. या दोन दिवसांत शहरात येणारे वाइन प्रेमी रेल्वे, बस, कॅब टॅक्सीचा वापर करत असल्याने टॅक्सीपासून हाॅटेलिंगपर्यंत स्थानिकांना यापासून रोजगार मिळणार आहे. फेस्टसाठी यापूर्वी प्रिंटिंग, तिकीट, फ्लेक्स मुंबई येथून तयार करून घेतले जात होते ही सर्व कामे शहरातील प्रिंटिंग प्रेसला देण्यात आलीत. स्टेज उभारणीही नाशिकच्या फाइव्हस्टार डेकोरला देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी बाहेर जाणारा पैसा पूर्णपणे नाशिककरांच्या पदरी येतोय. फेस्टसाठी सुलाकडूनच सुरक्षेसाठी महिला-पुरुषांची नेमणूक केली जात असल्याने या काळात १०० ते १५० लोकांना रोजगार मिळतो. पार्किंगच्या माध्यमातून ५० ते ६० युवकांना, तर हॉटेल मॅनेजमेटच्या १०० विद्यार्थ्यांना स्टायपेंड देऊन मार्गदर्शन केलं जातं.

किमान पंधरा काेटींची उलाढाल
फेस्ट च्यादिवसांतकिमान १५ काेटींची उलाढाल पर्यटन त्या संबंधित हाॅटेलिंग, ट्रॅव्हलिंग क्षेत्रात सहज हाेऊ शकते. शहरातील जवळपास सर्वच हाॅटेल्सच्या रूम्स या काळात बुक असतात. -दत्ता भालेराव, अध्यक्ष,ट्रॅव्हल एजंटस् असाेसिएशन

स्थानिकांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न
^"सुलाफेस्ट'च्या माध्यमातून शेतकरी, स्थानिक युवक आणि सामाजिक संस्थांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत असतो. गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्याच कारागीर कलाकारांना प्राधान्य दिलं जातंय. मोनीत ढवळे, असाे.व्हाइस प्रेसिडेंट, हाॅस्पिटॅलिटी, सुला विनियार्ड

सर्व रूम फुल्ल
^६ फेब्रुवारीच्या"सुला फेस्ट'साठी अामच्याकडील सर्व १२३ रूम्स बुक अाहेत. या काळात साधारणपणे १५ हजार आणि त्यावर कर असे २४ तासांसाठीचे भाडे आहे. रूम्सच्या उपलब्धतेवर अामचे रूम भाडे अवलंबून असते. अानंद कारिया, सेल्सएक्झिक्युटिव्ह, अायबीज् हाॅटेल