आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये तीन दिवस सुला फेस्टिव्हल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- थंड हवेची शीतलहर.. देशी परदेशी संगीतावर गायकाचे स्वर..डोळे दीपवणारी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई.. खाद्यपदार्थाची रेलचेल..आणि सोबतीला नाशिकमध्ये तयार झालेली सुलाची वाइन.. हळुवार वाइनचे घोट रिचवणारी तरुणाई..दोन दिवसांमध्ये वाइन पर्यटनाचा आनंद घेता येत नसल्याने यंदा सुला फेस्ट दोनऐवजी तीन दिवसांचा राहणार आहे. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या फेस्टचा अानंद राज्य, परराज्य विदेशातील तरुणांना लुटता येणार आहे.

सुला विनियार्ड दरवर्षी सुला फेस्ट आयोजित करीत असल्याने वाइन पर्यटकांना एक चांगली संधी मिळत आहे. त्यामुळे नाशिक शहराचाही आर्थिक विकास होत असल्याने व्यावसायिकदेखील या फेस्टची प्रतीक्षा करीत असतात. सुला विनियार्डने आतापर्यंत वेळा फेस्टचे आयोजन केले असून, यंदा दहावे वर्ष आहे. आतापर्यंत केवळ दोन दिवस असणारा फेस्ट आता तीन दिवसांचा असल्याने ते फेब्रुवारी असे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या फेस्टिवलसाठी परदेशी आर्केस्ट्रा राहणार असून, गायकदेखील परदेशी राहणार आहे. भारतातील प्रसिद्ध गायकाच्या गाण्यावर तरुणाई थिरकणार आहे. फेस्टमध्ये वाइन पर्यटकांना जिल्ह्यातील विविध द्राक्षांची वाइन चव चाखता येते. वाइन प्रोसेसिंगची माहिती देण्यात येत असल्याने महाविद्यालयीन युवकांची या फेस्टला अधिक गर्दी असते.

एक दिवसाची वाढ
यंदा सुला फेस्टचे दहावे वर्ष असल्याने वाइन पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना फेस्टचा लाभ मिळावा म्हणून एक दिवस वाढवण्यात आला आहे.
-कादंबरी वाईकर, सुला विनियार्ड
बातम्या आणखी आहेत...