आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकात वाइन फेस्टने तरुणाईला झिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशी-विदेशी कलाकारांचे झिंग आणणारे गीत-संगीत..त्यावर थिरकणारी तरुणाई. अशा नशिल्या वातावरणात देशाची वाइन कॅपिटल अर्थात नाशिकमधील ‘सुला फेस्ट’चा रविवारी समारोप झाला. या वेळी उपस्थितांत नाशिककर तरुणाईची संख्या लक्षणीय होती. दिवसभरात साठ टक्क्यांहून अधिक नाशिककरांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला.

भारतीय गायिका वसुधा शर्मा यांच्या गायनाने फेस्टच्या दुसर्‍या दिवसाला सुरुवात झाली व अमेरिकेतील सुप्रसिद्ध डी. जे. गावडींच्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रमेंट्सच्या संगीताने तरुणाई अक्षरश: झिंगली. आता पर्यटकांचे लक्ष विंचूर वाइन पार्क येथे होणार्‍या वाइन महोत्सवाकडे लागले आहे. शनिवारी पहिल्या दिवशी देश-विदेशातील पर्यटकांनी वाइन पर्यटनाचा आनंद लुटला होता. रविवारी साडेचार हजार पर्यटकांनी येथे भेट दिली.

यात विदेशी तसेच दिल्ली, मुंबई, बंगलोर येथील पर्यटकांचा समावेश होता. आवीयल या भारतीय बॅँडवर तरुणाईने धम्माल केली, तर वसुला शर्मा यांच्या गायनाने भारलेल्या सायंकाळी बंगलोरच्या बे सिटी लाईट बॅँडच्या तालावर तरुणाई थिरकली. महोत्सवात यंदा 100 टेंटची टेंट सिटी होती. फायर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ग्रेप स्टॉम्पिंगची विशेष व्यवस्था होती. नानाविध फूड स्टॉल्स होते. दक्षिण आफ्रिकन दांपत्याच्या फूड ज्यूसरीचे आकर्षण पर्यटकांना जास्त होते. मुंबईसह नाशिककरांनी येथे लावलेल्या स्टॉल्समध्ये वाइनशी संलग्न तसेच विविध वस्तूंची रेलचेल होती.

अधिक छायाचित्र पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...