आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये उद्यापासून रंगणार \'सुलाफेस्‍ट\'; वाईन, संगीत आणि पक्‍वान्‍नांची रेलचेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकः महाराष्‍ट्रात सर्वोत्कृष्‍ट वाईन निर्मिती होते, त्‍या नाशिकमध्‍ये उद्या 2 फेब्रुवारीपासून सहाव्‍या 'सुलाफेस्‍ट'ची रंगत अनुभवायला मिळणार आहे. दोन दिवस चालणारा हा संगीत महोत्‍सव नाशिकच्‍या सुला वाईनयार्डतर्फे आयोजित करण्‍यात येतो. महोत्‍सवात 'ब्‍लयूफ्रॉग'ची भागीदारी आहे. याशिवाय महोत्‍सवात उच्‍च दर्जाची वाईन, विविध प्रकारची पक्‍वान्‍ने आणि इतर रेलचेल राहणार आहे. रसिकांना सर्वोत्‍कृष्‍ट वाईन आणि चवदार पक्‍वान्‍नांच्‍या साथीला संगीताचाही आस्‍वाद घेता येईल.

सुला वाईनयार्डच्‍या परिसरात 2 आणि 3 फेब्रुवारीला हा महोत्‍सव रंगणार आहे. यावर्षी 'डिप फॉरेस्‍ट लाईव्‍ह', 'गौदी' 'इंदुबियस' यासारखे लोकप्रिय बँड महोत्‍सवातील आकर्षण राहणार आहेत.

(फोटोः गेल्या वर्षीच्‍या सुलाफेस्‍टमधील छायाचित्र)