आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकीच्या अपघातात मायलेक ठार, नाशकातील दुर्दैवी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नातेवाइकाच्या अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या आई व मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना सोमवारी सकाळी उंटवाडी रस्त्यावर घडली. आईला दुचाकीवर घेऊन मुलगा जात होता. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आई व मुलगा दोघानांही डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी संतप्त जमावाने ट्रक चालकाला पकडून बेदम चोप दिला. ट्रकच्या काचा फोडल्या.

सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विवेक सुरेश जैन- बोथरा (३५) व त्यांची आई मनिकुअर सुरेश जैन- बोथरा (६०) हे नातेवाइकाच्या अंत्ययात्रेसाठी जात होते. उंटवाडीरोड, खेतवानी लोन्स समोरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने विवेक यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दोघेही मायलेक रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी जमा होत तत्काळ पोलिस व रुग्णवाहिकेला संपर्क केला. उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान,या घटनेनंतर अपघातग्रस्त ट्रकचा चालक पळून जात हाेता. मात्र नागरिकांनी त्याला पकडले. काहींनी अपघातग्रस्त ट्रकच्या काचा फोडल्या व चालकाला बेदम चोप दिला. अंबड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यातच बघ्यांनीही गर्दी केली होती.
बातम्या आणखी आहेत...